शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड : भरधाव वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 21:47 IST

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खिंडीत एका भरधाव वाहनाच्या धडकेत दिड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना आज रवीवारी घडली आहे. 

मीरारोड : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खिंडीत एका भरधाव वाहनाच्या धडकेत दीड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना आज रवीवारी घडली आहे. काशिमीरा पोलिस ठाणे हद्दीतून जाणारा मुंबई - अहमदाबाद महामार्ग हा घोडबंदर खिंडीतुन जातो. आज रवीवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास खिडीतुन जाणारया मार्गावर बिबट्याचे पिल्लु मृत अवस्थेत आढळुन आले. सदर बाब वन खात्याचे अधिकारी व काशिमीरा पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या हे अंदाजे दिड वर्षाचे पिल्लु असुन भरधाव वेगाने जाणारया अनोळखी वाहनाने त्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यु झालाय. सदरची घटना आज पहाटे सुमारे ५ च्या सुमारास घडल्याचे सांगीतले जाते. वनक्षेत्रपाल संजय वाघमोडे, डॉ. पेठे, कर्मचारी खरात आदींनी बिबट्याच्या पिल्लाचा मृतदेह ताब्यात घेतला असुन शवविच्छेदन केले जाणार आहे. या घटने नंतर पिल्लाची आई वा नर यांचा परिसरात वावर वाढण्याची शक्यता पाहता वन अधिकारयांनी वन विभागाच्या जागेत वसलेल्या मॉर्डन झोपडपट्टी मध्ये जाऊन रहिवाशांना खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत. रहिवाशांनी कचरा बाहेर ठेऊ नये, रात्रीच्या वेळी शौचास बाहेर जंगलात जाऊ नये, कोंबड्या, कुत्री आदी पाळीव प्राणी बाहेर ठेऊ नये अशा सुचना रहिवाशांना केल्या आहेत. दरम्यान घोडबंदर खिंडीतुन महामार्ग जात असुन वास्तविक पुर्वी पासुनच या परिसरात बिबट्यांचे वास्तव्य व वावर आहे. बिबटे हे महामार्ग ओलांडुन नेहमीच खाली असलेले जंगल, झोपडपट्टी तसेच घोडबंदर गाव भागात भक्ष्य शोधत असतात. खिंडीतले वळण तिव्र असले तरी वाहनं ही खुपच वेगाने ये जा करत असल्याने या आधी देखील बिबट्यांच्या अपघाती मृत्युच्या घटना घडलेल्या आहेत. त्यातच आता महामार्गाचे रुंदिकरण होणार असल्याने बिबट्यांचे प्राण आणखीनच धोक्यात येणार आहेत. येथे केवळ फलक लाऊन भागणार नसुन वाहनांचा वेग आवरण्यासाठी खिडीच्या दोन्ही दिशेला महामार्ग प्राधिकरण व वाहतुक विभागाने आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची गरज निर्माण झाल्याचे मत प्राणिमित्रांनी व्यक्त केले आहे. तशीच स्थिती घोडबंदर मार्गावर काजुपाडा खिंडीत देखील असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.