शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

गटार सफाई करताना आढळले मृत अर्भक 

By धीरज परब | Updated: April 28, 2024 21:49 IST

पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत ते भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवले.

मीरारोड -  भाईंदर पूर्वेला एका वाणिज्य संकुलाच्या आवारातील गटारात सुमारे ६ इंच लांबीचे पुरुष जातीचे अर्भक सापडले. फाटक मार्गावर सालासर कमर्शियल सेंटर हि वाणिज्य संकुलाची इमारत आहे. सदर इमारतीच्या आवारातील दैनंदिन साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारास अंडरग्राउंड गटारात मृत अर्भक दिसून आले. नवघर पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रसुतीपूर्वचे हे अर्भक सुमारे ६ इंच लांबीचे व पाऊण किलो वजनाचे आहे. त्याच्या शरीराचे इतर अवयव देखील विकसित झालेले नव्हते. 

पोलिसांनी अर्भक ताब्यात घेत ते भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवले. पोलीस शिपाई राहुल चव्हाण यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलिसांनी २७ एप्रिलच्या रात्री अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी घेतले आहेत. ह्या इमारतीत सोनोग्राफी आदी विविध तपासण्या करणारी केंद्र आहेत. त्यामुळे या प्रकरणी प्राथमिक गुन्हा दाखल करून पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.  वरीष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवास गारळे हे या प्रकरणी तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस