शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र भातशेती नुकसान पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:03 IST

वसईत ६० ते ७५ टक्के नुकसानीचा अंदाज : शेतकरी झाले हवालदिल; डहाणू तहसीलदार कार्यालयात विशेष कक्ष

पारोळ : वसई तालुक्यात परतीच्या पावसाने झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असून सहा. कृषी अधिकारी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करताना दिसत आहेत. तालुक्यात साधारणपणे ६० ते ७५ टक्के भातशेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे.

यंदा वसई तालुक्यात साधारण पाच महिने पाऊस पडला असून आजही आभाळ भरलेच आहे. हंगामात ऐन कापणीच्या वेळेलाही पाऊस सुरूच राहिला. त्यामुळे लांबलेल्या कापण्यांमुळे शेतातील तयार पिकाच्या वजनदार कणसांवर पडणारे पाणी कणसांना अधिक वजनदार बनवत असल्याने उभी पिके आडवी पडली. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून येथील बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसामुळे भात पिकांचे झालेले नुकसान हे भाताला पुन्हा कोंब फुटल्याने, चिखलात दाणे नष्ट झाल्याने, तसेच पाण्यात जास्त वेळ राहून कुजल्याने झाले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक हाती लागावे म्हणून शेतात ओले सुकलेले ज्या परिस्थितीत पीक आहे त्या परिस्थितीत त्याची कापणी करून अंगणात, ओट्यावर, घरात आणले, मात्र रचलेल्या उडव्यांमधील ओलाव्यामुळे भाताच्या भाऱ्यांत प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि दाणे वाफल्यानेही नुकसान झाले आहे. भात नुकसानी बरोबरच झोडणीनंतर मजुरी खर्चाला हातभार लावणारे भात पिकाची पावली काळी पडल्याने त्याला ग्राहक नाही. तसेच पावसाच्या सुरवातीला वापरण्यात येणार गुरांचा चारा म्हणजेच पावली चारा म्हणून ठेवता येणार नसल्याने दोन्ही बाजूंनी शेतकºयांचे नुकसान आहे.भातशेती नुकसानीची पाहणी आम्ही थेट शेतात जाऊन करत असून भात, पेंढा, व पावली असे नुकसान झाले आहे. कापणी लांबल्याने काही भातपीक हाती लागले तरी दळताना कणी किंवा पीठ होण्याची शक्यता असून जेमतेम २० ते २५ टक्के पीक कामी येऊ शकेल. सुरू असलेले पंचनामे आम्ही पुढील कारवाईसाठी लकरात लवकर वरिष्ठ पातळीवर पाठवणार आहोत-अनिल मोरे, के टी संखेकृषी सहाय्यक अधिकारी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार