शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डहाणूतील राष्ट्रवादी फुटली, नगराध्यक्षांसह ४ आजी, २ माजी नगरसेवक भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 03:03 IST

डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रमिला पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून पालघर जिल्हयाचे पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, भाजपाचे प्रदेशाचे बापजी काटोळे यांच्या उपस्थितीत डहाणू येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात जाहिररित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

शौकत शेख डहाणू : आगामी १३ डिसेंबर रोजी होणा-या डहाणू नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच २० नोव्हेंबर रोजी डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रमिला पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून पालघर जिल्हयाचे पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, भाजपाचे प्रदेशाचे बापजी काटोळे यांच्या उपस्थितीत डहाणू येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात जाहिररित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांचयासोबत राष्टÑवादीचे माजी नगराध्यक्ष रमेश काकड, शमी पीरा, रेणुका राकमुथा, तारा बारी, आशा फाटक, या विद्यमान नगरसेवकांबरोबर माजी नगरसेवक शैलश राकमुथा यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. तर ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत बारी यांनी देखील प्रवेश केला असता तरी ते प्रकृती अस्वस्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. या सर्वांनी नगर परिषद सदस्य पदाचा राजीनाम देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान यापूर्वी आणि सोमवारी अशा एकूण ११ नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने डहाणू नगरपरिषद बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे.पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या डहाणू शहरात ३१ मे १९८५ पासून काँग्रेस आय, शिवसेना, राष्टÑवादी या पक्षांनी सत्ता भोगली आहे. गेल्या ३२ वर्षात डहाणू नगरपरिषदेने शासनाच्या विविध योजनेअंतर्गत आजतागायत शंभर कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करून विकासाची कामे केली. परंतु ठेकेदार, प्रशासन व काही नगरसेवकांच्या मिलिभगतमुळे असंख्य विकास कामे निकृष्ट झाली व त्यात लाखोंचा भ्रष्टाचार झाला. शिवाय अनेक योजनेत झालेल्या विकास कामांच्या वास्तूचे उपयोग न केल्याने शासनाचे लाखो रूपये पाण्यात गेले. डहाणू नगरपरिषदेच्या विकास कामात होत असलेला भ्रष्टाचाराबाबत डहाणू मतदार संघाचे आमदार पास्कल धनारे यांनी फेब्रुवारी २०१६ ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करून चौकशीचे आदेश जिल्हाधिकाºयांनी डहाणू उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत प्रत्यक्षात चौकशी करून अहवाल मागवला होता. त्या प्रमाणे विविध योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामाची सविस्तर चौकशी करून मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.डहाणू नगरपालिकेवर सध्या राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता होती. राष्टÑवादीकडे एकूण पंधरा नगरसेवक होते. त्यापैकी राष्ट्रवादीच्या अकरा (११) नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या पूर्वीच माजी नगराध्यक्ष मिहीर शाह, प्रकाश माच्छि प्रकाश बुजड तसेच अलका मर्दे यांनी राजीनामे दिले आहेत. तर राष्टÑवादीच्या लीलावती देवा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या राष्टÑवादी पक्षाकडे पंधरा नगरसेवकांपैकी नगरसेवक राजेश पारेख, राजेंद्र माच्छी, प्रदिप चाफेकर किर्ती मेहता असे केवळ चार नगरसेवक असल्याने त्याची अवस्था दयनीय झाली आहे. दरम्यान डहाणू नगरपरिषदेच्या पंचवीस जागांसाठी १२५ इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने आमची देखील कसोटी असल्याचे पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जाहिररित्या सांगितले आहे.

टॅग्स :BJPभाजपा