शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

डहाणूच्या महालक्ष्मीची यात्रा आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:10 AM

ठाणे, पालघर तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांची माय असणाऱ्या डहाणुच्या महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवारीपासून सुरु होत असून

कासा : ठाणे, पालघर तसेच गुजरात राज्यातील लाखो भाविकांची माय असणाऱ्या डहाणुच्या महालक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवारीपासून सुरु होत असून सतत पंधरा दिवस चालणाºया या यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेची जय्यत तयारी असल्याची माहिती श्री महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी दिली.सुरतमधील भाविक या देवीला आपली कुलस्वामीनी मानतात. यात्रा काळात दररोज येथे हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. महालक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खणा नारळांची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो. ही प्रथा अजूनही परंपरेनुसार सुरू आहे. चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होत असली तरी वर्षभर देवीचे बारसी, नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहात होतात. यात्रे दरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दूसरा होम असतो. या शक्तीमातेला येथील आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती समुदाय आपली कुलस्वामीनी मानतो. या मंदिरातील पुजारी आदिवासी समाजातील सातवी कुटूंबातील आहेत.अशी आहे आख्यायिकामहालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका असून देवी डहाणूला स्थायिक कशी झाली. या बाबत असे सांगितले जाते की, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरातमध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली असता, वाटेत विवळवेढे डोंगरा दरम्यान जात असताना विश्रांतीसाठी देवी मुसल्या डोंगरा जवळ गेली. पुढे येथील कान्हा ठाकूर नावाच्या व्यक्तीला देवीने दृष्टांत दिला व पुजा करण्यास सांगितले. कान्हा ठाकूर मोठ्या श्रद्धेने पुजा करू लागले. त्यानंतर देवी डहाणूला विवळवेढे येथे स्थायिक झाल्याची नोंदी पुराणात आहेत. महालक्ष्मी देवीच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात या बाबतचा मजकूर आहे.>मध्यरात्रीचे ध्वजारोहण पाहण्यासाठी मार्गात भाविकांची गर्दीमध्यरात्रीची ध्वजारोहणाची परंपरा चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज, पुजेचे साहित्य नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो. मध्यरात्री तीन वाजता तो डोंगरावर चढतो. तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. ध्वज लावण्यास जातो व सकाळी परत येतो.हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक मार्गात बसलेले असतात.त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारते असे म्हणतात. ध्वज लावण्याचे ठिकाण डोंगरावरील देवीच्या पूजेच्या स्थानापासून सहाशे फुट उंचीवर आहे. ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो तो दर पाच वर्षांनी बदलला जातो. ध्वज लावण्याचे हे देवकार्य वाघाडी येथील मोरेश्वर सातवी परंपरेने करतात.प्रसिद्ध महालक्ष्मी मातेचे मुळ वास्तव्य तिथल्याच एका डोंगरावर आहे. परंतु या डोंगर माथ्यावर जाणारी वाट अत्यंत अडचणीची व धोकादायक असल्याने देवीचे पुजारी व भाविकांच्या सहकार्याने मंदिर डोंगर पायथ्याशी बांधण्यात आले. परंतु आता मात्र दानशूर भाविक नारायण जावरे यांच्या प्रयत्नाने देवीचे मंदिर मुळ वास्तव असलेल्या डोंगरावरही सुंदर बांधले आहे. त्यास ‘महालक्ष्मी गड’ म्हणून ओळखले जाते.