शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू पं.स.ला गटशिक्षण अधिकारीच नाही, शिक्षण विस्तार अधिकाºयांवर भार, ं विद्यार्थ्यांचे होते आहे मोठे शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 05:47 IST

डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाला हक्काचा गटशिक्षणाधिकारी लाभलेला नाही. त्यामुळे शिक्षण विस्तारअधिकाºयांवर आलटूनपालटून पदभार सोपवला जात आहे. डहाणू तालुक्यात केवळ एकच शिक्षण विस्ताराधिकारी संपूर्ण तालुक्याची जबाबदारी या पुढे सांभाळणार आहे.

- अनिरुद्ध पाटील बोर्डी : डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाला हक्काचा गटशिक्षणाधिकारी लाभलेला नाही. त्यामुळे शिक्षण विस्तारअधिकाºयांवर आलटूनपालटून पदभार सोपवला जात आहे. डहाणू तालुक्यात केवळ एकच शिक्षण विस्ताराधिकारी संपूर्ण तालुक्याची जबाबदारी या पुढे सांभाळणार आहे.तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे बारा गट आहेत. मात्र महादू पवार, विष्णू रावते आणि अरविंद वाघ हे केवळ तीनच शिक्षण विस्ताराधिकारी कार्यरत आहेत. दरम्यान २० जुलै रोजी ४० हजाराची लाच मागितल्याच्या आरोपा प्रकरणी गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार (श्रेणी २ ) यांच्यावर तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी निलंबनाची कारवाई केली. या घटनेला आठवडाभराने दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होईल. मात्र ही जागा भरण्यात आलेली नाही. शिवाय आजही डहाणू गटविकास अधिकाºयांच्या दालनाबाहेर सोनार यांच्याच नावाची पाटी लागलेली आहे. त्यामुळे एकूणच डहाणू पंचायत समिती प्रशासनावर सोनार यांचे किती वर्चस्व होते याची प्रचिती येते.सोनार यांच्या जागी विस्तारअधिकारी महादू पवार यांना प्रभारी पद देण्यात आले. विस्तार अधिकारी पदासह दुहेरी कसरत करीत असताना पवार हे महिन्याभरासाठी रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी विष्णू रावते यांची वर्णी लावण्याचे फर्मान जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी काढल्यानंतर रावते यांनी गुरु वार १४ सप्टेंबर रोजी प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा भार स्वीकारला आहे. सदर जबाबदारी पहिल्यांदाच स्वीकारत आहेत. परंतु वाघ या केवळ एकाच विस्तारअधिकाºयावर संपूर्ण तालुक्याचा भार येणारे आहे. त्यामुळे तालुका आणि जिल्हा प्रशासन पुरोगामी महाराष्ट्राला कोणता आदर्श घालून देत आहेत.आज डहाणू तालुका हा प्रभारी तसेच अतिरिक्त भार स्वीकारलेल्या गट विकास आणि गट शिक्षणाधिकारी यांच्या बळावर कसा विकास साधणार या कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सक्षम नसल्याने हे घडत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. या स्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मात्र फार मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे. शिक्षकांची वानवा, पायाभूत सुविधांचा अभाव अशा स्थितीत आता प्रशासकीय अधिकाºयांच्या टंचाईची भर त्यात पडली आहे.पदाधिका-यांकडे लक्षया बाबत शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष आणि डहाणू पंचायत समिती सभापती लोकमतच्या वृत्तानंतर ही समस्या सोडवतील का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.