शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

डहाणू-नाशिक मार्गावरील कालवा धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 00:06 IST

डहाणू नाशिक राज्यमार्गावर सारणी येथे सुर्या उजवा तीर कालव्याच्या मुख्य कालवा ( सारणी) साखळी क्र .११/३७५ पूर्णत: जीर्ण झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

- शौकत शेख डहाणू : डहाणू नाशिक राज्यमार्गावर सारणी येथे सुर्या उजवा तीर कालव्याच्या मुख्य कालवा ( सारणी) साखळी क्र .११/३७५ पूर्णत: जीर्ण झाला असून वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या पुलाचे निखळलेले स्लॅब आणि गंजलेल्या सळया बाहेर निघाल्याने पुल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.तालुक्यातील डहाणू नाशिक राज्यमार्गावरु न मुंबई अहमदाबाद हायवे गाठण्यासाठी डहाणू -चारोटी राज्यमार्ग तसेच वाणगाव-वधना राज्यमार्गाला सारणी पुलावरून वाहतूक केली जाते. डहाणू शहर, सरावली, आसवे, आशगड, गंजाड, रायतळी रानशेत तसेच वाणगाव निजकची सर्व वाहतूक सारणी पुलावरून केली जाते. म्हणजे तब्बल ६० हुन अधिक गावांचा भार या पुलावरून वाहला जात आहे.सुर्या उजवा तीर कालव्याहुन गावांना पाणी वाहून नेण्यासाठी सारणी येथे राज्यमार्ग ओलांडण्यासाठी पुल बांधण्यात आला आहे. परिणामी सारणी पुल दिमाखात खंबीरपणे उभे असल्याचे बाहेरून दिसत असले तरी या पुलाचा स्लॅब कोसललेला आहे. हा पुल कमकुवत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. पाटबंधारे विभागाकडून आवश्यक ती डागडूजीची केली जात नसल्याचे या भागातील वाहन चालक, प्रवाशांचे म्हणणे आहे. या पुलावर कोणतेही संरक्षक कठडा अथवा पथदिव्याची व्यवस्था नाही त्यामुळे भरधाव दुचाकी थेट कालव्यात पडुन मागे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. हा पूल कोसळल्या अनेक गावांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होणार आहे. तर सदरचा पुल हा पाटबंधारे खात्याच्या अखत्यारित येत असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने आपली जबाबदारी झटकली आहे. या राज्य मार्गावर रिलायन्स औष्णिक प्रकल्पाची राख वाहून नेणाऱ्या अतिभार वाहनांची या पुलावरून दिवसरात्र वाहतूक सुरु असते.>या वर्षीच्या नियोजनात डहाणू नाशिक राज्यमार्ग वरील अनेक लहान मोठे पुल घेतले आहेत. त्यामध्ये सारणी पुलाचा अंतर्भाव आहे. - खैरनार, उप अभियंतास.बा. डहाणू उपविभागया पुलाबाबत वारंवार पीडब्ल्यूडीला सूचना केल्या आहेत .येथे नवीन पूल बांधणे गरजेचे आहे . - अमित घोडा, आमदार