शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

डहाणूतील जनजीवन ठप्प, पेरण्या वाचल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 02:27 IST

तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. सोमवारी संध्याळपासून सुरू झालेल्या पावसाने नदी नाल्यांना पूर आल्याने चिंचणी, वरोर, बाडापोखरण सारख्या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन अत्यंत विस्कळीत झाले होते. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर उतरताच ते पूर्ववत झाले. दरम्यान डहाणूत गेल्या २४ तासात १२६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून आता पर्यंत ११९६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने डहणूच्या बंदरपट्टी भागांतील शेतकऱ्यांनी भात लावणीच्या कामांना जोरदार सुरूवात केली आहे.साधारणता: जूनच्या सुरूवातीस दमदार पावसाला सुरूवात होईल अशी शक्यता राज्याच्या हवामान खात्याने वर्तविली असतांना प्रत्यक्षात पासाने उशिराने सुरूवात केली त्यामुळे भात रोपे उन्हाने काहिशी करपून गेली होती. त्यांना जीवनदान मिळाल्याने आताच्या पावसाने भात लावणीस शेतकऱ्यांनी जोरदार सुरूवात केली असली तरी त्यांना मजूराची उणीव भासू लागली आहे.दरम्यान सोमवारपासून पाऊस सुरू झाल्याने येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली होती. पावसाचा जोर पाहता येथील शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.मृत व्यक्तीच्या वारसाना आर्थिक मदत डहाणूच्या कंक्राडी नदीला आलेल्या पूरात २६ जूनला नातेवाईकाच्या घरी जात असलेल्या कामू सून्या हाडळ रा. कैनाड ही पूरात वाहून मृत्यूमुखी पडली होती. तर २ जुलै रोजी बहारे येथे शेतावर जात असतांना दिपक पांडू धांगडा यांचा ते वंगन नदी ओलांडत असतांना वाहून बूडून मृत्यू झाला. या दोघांच्या कुटुंबियांना डहाणूच्या तहसीलदार प्रितीलता कौरथी यांनी आर्थिक सहाय्य अनुदान म्हणून प्रत्येकी चार लाखांचा धनादेश दिला.