शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

Dahanu: डहाणू समुद्रात बोट उलटून मच्छीमाराचा मृत्यू, एकजण बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 15:17 IST

Dahanu Boat Accident: डहाणू गावच्या समुद्रातून छोटी बोट घेऊन मासेमारीला गेलेल्या दोन तरुण मच्छीमारांपैकी एकाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी डहाणूच्या किनाऱ्यावर आढळला. बोट बुडताच दुसरा तरुण पोहत किनाऱ्यावर पोहचला.

- अनिरुद्ध पाटील बोर्डी  - डहाणू गावच्या समुद्रातून छोटी बोट घेऊन मासेमारीला गेलेल्या दोन तरुण मच्छीमारांपैकी एकाचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी डहाणूच्या किनाऱ्यावर आढळला. बोट बुडताच दुसरा तरुण पोहत किनाऱ्यावर पोहचला. बेपत्ता मच्छीमारासाठी स्थानिक मच्छीमार व तटरक्षक दलाने शोध मोहीम हाती घेतली होती, मात्र त्यांना अपयश आले.

डहाणू तालुक्यातील मोठी डहाणूच्या मांगेलवाडी येथील दोन मच्छीमार 26 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास छोटी बोट घेऊन किनाऱ्यापासून एक नोटिकल अंतरावर पारंपरिक पद्धतीच्या बोंबील मासेमारीला गेले होते. लाटेच्या ताडाख्याने बोट उलटून दोघेही पाण्यात फेकले गेले. त्यापैकी संजय प्रकाश पाटील (32) याने  पोहून किनारा गाठला, मात्र भुपेंद्र किशोर अंभिरे (34) हा जाळ्यात अडकल्याने त्याला बाहेर पडता आले नव्हते.

दरम्यान, संजय याने अपघाताची माहिती कोळी बांधवांना दिल्यानंतर स्थानिक मच्छीमार, ग्राम सुरक्षा दल, सागरी सुरक्षा दल यांनी शोध मोहीम राबवली. खवळलेला समुद्र तसेच पुराचे पाणी इ. मुळे बेपत्ता तरुणाला शोधण्यात अपयश आले. त्यामुळे भारतीय तटरक्षक दलाने शोध मोहीम हाती घेतली मात्र यश न आल्याने सायंकाळनंतर मोहीम थांबविण्यात आली.

दरम्यान, गुरुवारी सकाळी गहाळ झालेल्या मच्छीमाराचा मृतदेह हाती लागल्याची माहिती डहाणू पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांनी दिली. मृत मच्छीमाराच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील व भाऊबहीण इ. समावेश असल्याची माहिती आप्तेष्टांना दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघरAccidentअपघात