शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

डहाणू दुर्घटना : स्पीड बोटी होत्या नादुरुस्त, सागरी पोलिसांच्या बोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:07 IST

सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी, तटरक्षक दलाच्या होड्या आणि मेरीटाईम तसेच प्रशासनाच्या अन्य बोटी मदतीला आल्या नाहीत. त्या पैकी सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

डहाणू : सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी, तटरक्षक दलाच्या होड्या आणि मेरीटाईम तसेच प्रशासनाच्या अन्य बोटी मदतीला आल्या नाहीत. त्या पैकी सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तटरक्षक दलाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांची बोट घेउन घटनास्थळ गाठले. त्यानंतर दमण येथून हेलिकॉप्टर मागविण्यात आले. सुमारे सहा तास समुद्रात हेलिकॉप्टरने शोधकार्य हाती घेतल्याने दुसºया हेलिकॉप्टरची मदत घेतल्याचे तटरक्षक दलाच्या डहाणू विभागाचे कामांडन्ट एम. विजयकुमार यांनी दिली.सतीपाडा समोरील किनाºयावर सुधीर दत्ताराम अक्रे ४७ वय, राहुल ठाकूर, भावेश घाटाल, विठ्ठल लाखात, सुरज लाखात, आनंद दिवेकर, जयेश दिवेकर, सनी वेडगा, मनीष सालकर, शापुर सालकर, विजय दुबळा सलीम रमजान शेख यांच्यासह अन्य मच्छीमार मदतीकरिता गेले गेले होते. विद्यार्थिनींना छोट्या होडीत आणि त्यानंतर मोठ्या बोटीतून किनाºयावर पाठवले.काही दिवसांपूर्वी सागरी सफरीची सेवा देणारी ही बोट या परिसरात आली कशी? तिच्याकडे आवश्यक तो परवाना आणि सफर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षात्मक बाबी होत्या का़य याची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. जर या बाबी नसतील तर बोटीच्या मालकाविरूध्द आणि चालकाविरूध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.१७ विद्यार्थिनी उपचारानंतर घरीहेमंत कुमावत, अमन हरजिन, शिवम गुप्ता, उर्वीस शहा, हिमाउद्दीन खान, अरबाज पठाण हे विद्यार्थी सुरक्षित घरी गेल्याची माहिती कनिष्ठ विद्यालयाचे उप प्राचार्य सोपान इंगळे यांनी दिली असून, एकूण तीस विद्यार्थी समुद्रसफरीवर गेल्याचे म्हटले आहे.तर मोसुदा परवेझ शेख, सोनी मौर्य, हेमल सुरती, बरखा धोडी, आरती सुरती, करिना मायावंशी, टिना मायावंशी, वैशाली मायावंशी,कीर्ती मायावंशी पल्लवी दिंडे, सना खान, जानव्ही वाढीया, ईशा वाढीया, प्रियंका गुप्ता, तेजल माच्छी, सोनल तडवी, डेझी झाईवाला, सपना वाघ, सुमन जयस्वाल, मिसबा मुन्शी, कुरेशी हिना या विद्यार्थिनी बोटीत गेल्या होत्या त्यापैकी हिना वगळता अन्य विद्यार्थिनी आणि बोटचालक महेंद्र अंबिरे यांना डहाणू येथील आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी या सतरा विद्यार्थिनींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात