शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

डहाणू दुर्घटना : सारे बळी लोभाचे आणि बेदरकारीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 3:51 AM

येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती.

डहाणू : येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती. या दोनही घटनांत काहींचा बळीही गेला होता. या घटनांपासून कुणी काहीही धडा शिकले नाही, त्यामुळे आजचीही घटना घडली. त्यामुळे ठराविक काळाने अशा दुर्घटना घडत असतात.या तीनही घटनांना लाँन्च मालकांचा जास्ती कमाई करण्याचा लोभ व त्यासाठी जास्त प्रवासी भरण्याची हाव तर त्यात बसलेल्या प्रवाशांनी बोटीचा तोल राखण्याबाबत दाखविलेली बेदरकारी हीच कारणे कारणीभूत ठरली होती. सिल्व्हासा येथील एका रिसॉर्टच्या मालकाने आपल्या पर्यटकांना जलसफर घडविण्यासाठी नवी कोरी अत्याधुनिक लाँन्च घेतली होती तिच्यातून सैर करण्यासाठी आपल्या मुंबईच्या मित्र परिवाराला खास आमंत्रीत केले होते. स्वत: तिचे मालक यावेळी त्यांच्या सोबत होते.तरीही त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने असलेले प्रवासी संख्येचे बंधन झुगारले व त्याची किंमत बोटीतील काहींना आपल्या प्राणाचे मोल देऊन मोजावी लागली.खोचिवडे-उत्तन समुद्रातील घटनाही अशीच होती तिथे लाँन्च नव्हत्याच त्यामुळे गावातीलच होडीवाला स्थानिक प्रवाशांची छोट्या अंतरासाठी ने-आण करायचा मुळात ही बोट प्रवासी वाहतूकीसाठी नव्हतीच तरीही ती त्यासाठी वापरली गेली. ते करतांनाही प्रवासीसंख्येचे बंधन पाळले नाही. मिळतील तेवढे भाविक भरले गेले. त्यातून अनर्थ घडला आणि यात्रेचे रूपांतर सुतकी परिवारात झाले.शनिवारच्या घटनेतही असेच घडले. या किनाºयावर ही बोट तीन चार दिवसांपूर्वीच समुद्रातली जवळच्या अंतरावरील ट्रीप घडविण्यासाठी आणली गेली होती. समुद्र उथळ असल्याने ती किनाºयापर्यंत आणता येत नव्हती त्यामुळे ती ३० ते ४० मीटर खोल नांगरून ठेवली जात होती. बोटीतून प्रवासी अथवा पर्यटक तिच्यापर्यंत नेले जात होते. याही वेळी प्रवासी संख्येचे बंधन आणि बोटीचा तोल सांभाळण्याचा नियम पाळला गेला नाही त्यातून हा अनर्थ घडला.अशी घडली दुर्घटना झाला आक्रोशया दुर्घटनेतून बचावलेल्या एका विद्यार्थीनीने सांगितले की, शुक्रवारी सकाळी आम्ही कॉलेज संपल्यावर समुद्राच्या सफरीवर जायचे ठरविले. आमच्याच गृपमधील काही जण आमच्या आधी अशी सैर करून सुखरूप आले होते. त्यामुळे आमचा उत्साह वाढला होता. म्हणून आम्हीही अशा सफरीवर जायचे ठरविले. छोटया होडक्यातून आम्ही लॉन्च पर्यंत गेलो. सगळे बसल्यावर धांगडधिंगा सुरू झाला. कोण काय करतो आहे हे कुणालाच कळत नव्हते.सेल्फी काढण्याची स्पर्धा सुरू झाली. सगळयांनाच लॉन्चच्या एका बाजूच्या कडेला जाऊन सेल्फी काढायचे होते. तो चांगला येण्यासाठी सगळयांच्या चेहºयावर भरपूर प्रकाश येणे आवश्यक होते त्यामुळे सगळे ग्रुप लॉन्चच्या डाव्या बाजूच्या कडेवर एकवटले त्यामुळे लॉन्चचा तोल गेला. काय होते आहे हे कळण्यापूर्वीच ती कलंडली आणि काही पाण्यात पडले तर बोटीत पाणी शीरू लागताच रडारड आणि आईऽऽ ग च्या किंकाळया सुरु झाल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार