शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नाला बुजवणाऱ्या ठेकेदारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:59 PM

वसई विरार महापालिकेच्या नवघर माणिकपूर एच प्रभागात येणाऱ्या दिवणमान येथील सूर्यागार्डन परिसरातून जाणाऱ्या खाजण जमिनीच्या वसई, नायगाव खाडीत जाणारा नाला महापालिकेच्या ठेकेदाराने बाजूला असलेल्या जमीन मालकाची परवानगी न घेता त्यात प्रवेश करून व त्यातील शेकडो ब्रास माती काढून बुजविला.

पारोळ : वसई विरार महापालिकेच्या नवघर माणिकपूर एच प्रभागात येणाऱ्या दिवणमान येथील सूर्यागार्डन परिसरातून जाणाऱ्या खाजण जमिनीच्या वसई, नायगाव खाडीत जाणारा नाला महापालिकेच्या ठेकेदाराने बाजूला असलेल्या जमीन मालकाची परवानगी न घेता त्यात प्रवेश करून व त्यातील शेकडो ब्रास माती काढून बुजविला. हा प्रकार जमीन मालकाच्या सतर्कतेमुळे उघड झाला. या प्रकरणी संबधित ठेकेदारासह त्यांच्या दोन साथीदारांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांना जामीन मंजूर झाला असून या प्रकरणात महापालिकेच्या संबंधित अधिकारीºयावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबत तपास चालू असल्याचे पोलीस अधिकारी बेग यांनी सांगितले.वसई तील मौजे दिवणमान सर्व्हे न ६२ या जागेचे मालक अमृत कडुलकर आणि इतर असून त्यातून जेसीबीद्वारे मातीचे उत्खनन करून नैसर्गिक व खाडीपात्रात जाणारा नाला बुजवित असल्याची माहिती मिळाली तेव्हा कडुलकरांनी ते काम थांबवून तेथे असलेलेल्या ठेकेदाराला जाब विचारला असता सुरू असलेले काम पालिकेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पोलिसांसह महापालिकेच्या अधिकाºयांना बोलावून जाब विचारला असता तर आम्हाला खाडीवर रुंद पूल बांधण्याचा ठेका दिल्याचे त्यांनी सांगितले. तर या ठेकेदाराने शेतातून माती काढून नाला बुजवल्याचे निदर्शनास आणून दिले. जमीन मालकाने नोंदविलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी बालाजी कन्स्ट्रक्शन चा मुख्य ठेकेदार बबन मोहिते, जेसीबी चालक शिव निषाद व त्या कामाचा ठेकेदार सुनील नाईक यांना अटक केली.हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून वसईला पुन्हा बुडावण्याचा डाव आहे या बाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्या कडे दाद मागू- भूपेश कडुलकर, जमीन मालक 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका