शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

फेसबुकवरून शरद पवारांवर टीका, कार्यकर्त्यांकडून अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:46 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना फेसबुक अकाऊंटवर जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या माथेफिरूच्या पोस्टमुळे वसईत खळबळ उडाली आहे.

वसई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना फेसबुक अकाऊंटवर जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या माथेफिरूच्या पोस्टमुळे वसईत खळबळ उडाली आहे. त्या व्यक्तीला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत असून, पोलिसांच्या चौकशीदरम्यान ती व्यक्ती मानिसक आजारी असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षकांना दिली.१६ एप्रिल रोजी महेश खोपकर या व्यक्तीने आपल्या फेसबूक अकाऊंटवर रात्री १२:०४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारे लिखाण केले होते. तसेच, गलिच्छ शब्दांचा वापर करण्यात आला होता. त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात यावी अशी मागणी १८ एप्रिल रोजी वसईचे अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांना भेटून मुझफ्फर घन्सार, सचिन कदम, चंद्रकांत कदम, तवंगर सिद्दीकी, महेश पवार, सुभाष जयस्वाल, इम्रान शेख यांनी केली होती.यावेळेस अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांनी, आरोपी महेश खोपकर याचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही करून त्यास तातडीने अटक करण्याचे आदेश तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांना दिले होते.>राष्टÑवादीकडून आंदोलनाची धमकीसोशल मिडीयावरील प्रकार समजताच राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने गुरु वारी अपर पोलीस अधीक्षकांची वसईत भेट घेऊन त्यांना कारवाई संबधीचे निवेदन दिले. या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेता, महेश खोपकर याला तातडीने अटक करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती कदम यांनी दिली.>माफी मागूनही मनसैनिक संतप्तनालासोपारा : रोहन दातार या युवकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह विधान पोस्ट केल्याने मनसे कार्यकर्ते संतप्त झाले होते. दातार याने फेसबुकच्या माध्यमातून जाहीर माफी मागितली आहे. परंतु, त्याला माफ करणार नसल्याची भूमिका खांबे यांनी घेतली आहे. मनसेकडून कारवाईची मागणी होत आहे.>मनसेने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारीनी तक्रारीचे निवेदन दिले आहे. नालासोपारा पश्चिमेकडे राहणाºया महेश खोपकरला गुरु वारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात आणले होते पण तो वेडा असून त्याच्या पत्नीने त्याच्या उपचाराची फाईल घेऊन पोलीस ठाण्यात आल्यावर उपचार करणाºया डॉक्टरांनाही संपर्क साधला असून त्यांनीही महेश मनोरुग्ण असल्याचे सांगितल्यावर त्याला सोडून देण्यात आले.- डॅनियल बेन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार