शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Crime: मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरातमध्ये केली हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह भरून फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:30 IST

Crime: बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरात राज्यात हत्या झाल्याचे उघड झाल्याने वसईत खळबळ माजली आहे. तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून वलसाड येथील खाडीत फेकून देण्यात आला आहे.

नालासोपारा : बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरात राज्यात हत्या झाल्याचे उघड झाल्याने वसईत खळबळ माजली आहे. तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून वलसाड येथील खाडीत फेकून देण्यात आला आहे. नायगाव पोलिसांनी सोमवारी रात्री हत्या, हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी मनोहर शुक्ला (वय ४३) याला अटक केली आहे.

नायगावच्या सनटेक इमारतीत राहणारी नयना महंत (वय २८) ही तरुणी सिनेमात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची. १२ ऑगस्टपासून ती बेपत्ता असल्याने तिच्या बहिणीने १४ ऑगस्टला हरवल्याची तक्रार नायगाव पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस तपासात नयनाची हत्या तिचा पूर्वीचा प्रियकर मनोहर शुक्ला (४३) याने केल्याचे उघड झाले आहे.

आरोपी माजी प्रियकर नयना महंत ही पूर्वी वसईला राहत होती. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या आरोपी मनोहर शुक्लाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते, मात्र तो विवाहित असल्याचे समजल्यानंतर तिने हे संबंध तोडले. वालीव पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी शुक्ला तिच्यावर दबाव टाकत होता. याच कारणावरून हत्या करुन पुरावा नष्ट केल्याने गुन्हा दाखल केला आहे.

 तिची पाण्यात बुडवून हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरला. ती सुटकेस आरोपीने गुजरातच्या वलसाड येथील खाडीत टाकून दिली. पोलिसांना तिचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी मनोहर शुक्लाला मंगळवारी सकाळी अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले - श्रींगी यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार