शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Crime: घरफोडी आणि चोरी करणाऱ्या आरोपीला अटक, वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 18:38 IST

Crime: घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश मिळाले आहे. आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल करून काही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी दिली आहे. 

- मंगेश कराळे

नालासोपारा - घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात वसईच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश मिळाले आहे. आरोपीकडून ६ गुन्ह्यांची उकल करून काही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी दिली आहे. 

बाभोळा येथील पुष्कर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या समिता विश्वास मोरे यांच्या घरी १७ जुलैला संध्याकाळी चोरट्यांनी चांदीचे दागिने चोरी करून नेले होते. याप्रकरणी वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मागील काही दिवसामध्ये वसई पोलीस ठाण्याच्या हद्दिमध्ये घरफोडी व चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. सदर गुन्हयांना आळा घालून दाखल गुन्हयांची लवकरात लवकर उकल करण्यासाठी वरिष्ठांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने दोन पथके तयार करुन गुन्हयाचा तपास चालू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त बातमी व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी राकेश राजेश मस्तान याला ताब्यात घेतले. आरोपीकडे तपास केल्यावर आरोपीने नमुद गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक केली आहे. त्याच्याकडे केलेल्या तपासा दरम्यान त्याने वसई व माणिकपुर पोलिस ठाणे कार्यक्षेञात ६ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॅमेरा असा ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौणिमा चौगुली-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांचे मार्गदर्शनाखाली वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) ऋषिकेश पवळ, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम सुरवसे, सुनिल पवार, पोलीस हवालदार सुनिल मलावकर, मिलींद घरत, सुर्यकांत मुंढे, अक्षय नांदगावकर यांनी केलेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार