शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Virar Covid Hospital Fire: व्यवस्थापन आणि डॉक्टरांवर विरार दुर्घटनेप्रकरणी गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 00:36 IST

आयसीयू सेंटरमध्ये उपाययोजना न केल्याचा आरोप

नालासोपारा : विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवामध्ये १५ निष्पाप रुग्णांना शुक्रवारी पहाटे आपला प्राण गमवावा लागला होता. याप्रकरणी पोलिसांनी अखेर अर्नाळा पोलीस ठाण्यात हॉस्पिटलचे व्यवस्थापक, डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या कलमांन्वये मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

विजय वल्लभ हॉस्पिटलचे व्यवस्थापक दिलीप शहा, बस्तीमल शहा, शैलेश पाठक तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचारी यांनी आयसीयू सेंटरमध्ये कोरोना रुग्ण असताना आगीसारखी घटना घडल्यास रुग्णांना अपाय होईल ही पूर्णपणे कल्पना असतानाही उपाययोजना न केल्यामुळे आगीसारखी घटना घडून १५ रुग्णांच्या मृत्यूस आणि इतर रुग्ण जखमी होण्यास कारणीभूत झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुर्घटनेत जळगावच्या वृद्धाचाही होरपळून मृत्यू

पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील विजय वल्लभ या खासगी कोरोना रुग्णालयात एसीच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत जळगाव शहरातील निवृत्तीनगर येथील नरेंद्र शंकरराव शिंदे यांचाही होरपळून मृत्यू झाला. रुग्णालयाच्या ज्या अतिदक्षता विभागात शुक्रवारी पहाटे आग लागली, तेथेच शिंदे यांच्यावरही उपचार सुरू होते. शिंदे हे पेपर मार्टच्या दुकानात कामाला होते.

दीड वर्षांपूर्वी ते पत्नीसह टिटवाळा येथे वास्तव्याला असलेला मुलगा कार्तिक याच्याकडे गेले.  तेथे मुलगा कार्तिक याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर काही दिवसांत नरेंद्र यांनाही लागण झाली. प्रकृती खालावल्याने त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हॉस्पिटलच्या व्यवस्थापक, डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जाबजबाब सुरू असून चौकशी सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.- संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन

लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनाला धडा शिकवा. राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत. परंतु भविष्यात कुठलेही राजकीय संबंध या चौकशीच्या आड येता कामा नये. मृतांना आणि त्याच्या नातेवाइकांना न्याय मिळालाच पाहिजे व दोषींना शासन झालेच पाहिजे.- सुदेश चौधरी, माजी नगरसेवक 

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराVasai Virarवसई विरारfireआग