शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटचा सट्टाबाजार तेजीत, दररोज लाखोंचा गेम, शेकडो संसार बर्बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 06:35 IST

डहाणू तालुक्यात खास करून शहरामध्ये क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टाबाजार सुरु असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

- शौकत शेखडहाणू : तालुक्यात खास करून शहरामध्ये क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टाबाजार सुरु असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे झटपट पैसे कमाविण्याच्या नादात येथील शेकडो सुशिक्षित तरुण, आई, वडीलांना न कळवत क्रिकेटचा खेळावर पैसे लावून कंगाल होत आहेत. या सट्ट्यामध्ये शहरातील लहान सहान व्यापारी काही कारखानादारां बरोबरच काही नोकरी, व्यवसाय करणारे तरुणही आकर्षित झाले आहेत. पोलिसांनी या बुकींवर कठोर कारवाई करून हे रॅकेट उध्वस्त करावे, अशी मागणी येथील काही पालक तसेच नागरीकांकडून होत आहे.सध्या बांगलादेश येथे सुरु असलेल्या बी.पी.एल. मॅचवर रात्र, दिवस सट्टा लावला जात आहे. डहाणूतील काही बुकी या क्रिकेट मॅच वर सट्टा घेतात. त्यात एक बुकी तर डहाणू पोलीसठाण्यापासून हाकेच्या अंतरावर (मागच्या इमारतीत) आहे. तो डहाणूत राहून क्रिकेटवर सट्टा घेतो. परंतु पोलिसांना दाखविण्यासाठी त्यांनी मीरारोड येथे राहत असल्याचा देखावा केला आहे. प्रत्येक विकेट, ओवर, किती रन होणार, कोण मॅच जिंकणार तसेच प्रत्येक बॉलवर शेकडो लोकांकडून कमी जास्त मोबदल्यात दररोज लाखोंचा जुगार खेळला जात आहे. क्रिकेट सुरू झाल्यावर डहाणूतील बुकीने ठेवलेल्या फंटर मार्फत मोबाईल संभाषणाने सट्टा बुकींग घेतली जाते. डहाणूतील काही उपहारगृह, सलून तसेच पानटपरी बरोबरच बुकीने ठेवलेल्या फन्टर मार्फत दररोज सकाळी पैसे वसूल करण्याचे काम होत आहे. आज पर्यंतचा इतिहास पाहता सट्टा लावणाºयापेक्षा दुप्पट, तिप्पट फायदा बुकीचाच झाल्याचे दिसून येते. त्यामुळे असंख्य जुगाºयांचे संसार उध्वस्त झाले आहे.दरम्यान बांगलादेश येथे चालणाºया दरोजच्या दोन मॅचवर डहाणूतील असंख्य सुशिक्षित बेरोजगार बर्बाद होत असतांना दिसत आहेत. आई, वडीलाने शाळा, महाविद्यालय तसेच घरगुती कामांसाठी दिलेले पैसे, तसेच लहान सहान दुकानात झालेली कमाई हे तरुण सट्ट्यावर लावून कर्जबाजारी झाल्याची चर्चा डहाणू शहरात होत आहे. शहरातील एक तरुण गेल्या वर्षी सुरु असलेल्या मॅचवर रात्रभर पंधरा लाख हरल्यानंतर सकाळी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अशा तºहेने अनेक तरुणांची दयनीय अवस्था झाली आहे.क्रिकेटवर सट्टा घेणारे बुकी कोण आहे. पोलिसांना माहिती नाही का? पोलीस का? मग ते कारवाई का करीत नाही? असा प्रश्न डहाणूच्या नागरीकांकडून होत असून पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा