शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus विरार नालासोपाऱ्याची चिंता वाढली; पालिका हद्दीत 11 कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 21:36 IST

संख्या पोहचली 200  वर  ; शनिवारी 3 कोरोना मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क  वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शनिवारी वसई वगळता विरार व नालासोपारा भागात सर्वाधिक 11 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर यामध्ये विरार पूर्व पश्चिम मध्ये सर्वाधिक असे 7 पुरुष रुग्ण असून त्याच्या पाठोपाठ नालासोपाऱ्यात हि 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.

त्यामुळे शनिवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 200 वर पोहचली असून वसई विरार पालिका हद्दीतील रुग्णालयातुन शनिवारी 3 रुग्ण देखील मुक्त झाल्याची माहिती पालिकेने दिली.   पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये वसईतून एकही रुग्ण सापडला नाही,तर विरार मध्ये सर्वाधिक 7 पुरुष व नालासोपारात 2 पुरुष आणि 2 महिला असे मिळून एकूण 11 रुग्ण बाधित आढळून आल्याने पालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे नालासोपाऱ्यात आढळून आलेल्या 54 वर्षीय व 21 वर्षीय दोघी महिला या जोगेश्वरी येथील रुग्णालयास भेट दिल्याने त्या बाधित आढळून आल्या आहेत.तर विरार मधील एक 47 वर्षीय रुग्ण हा बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कांत आहे.तर उर्वरित विरार व नालासोपारा मध्ये आढळून आलेले 8 पुरुष रुग्ण यात हॉटेल कर्मचारी ,केटरिंग स्टा फ,फूड वितरक,पाणीपुरवठा विभाग ,रुग्णालय कर्मचारी आणि हॉटेल कर्मचारी असे हे मुंबईत काम करणारे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.दरम्यान या रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 200 तर पालिका हद्दीत 8 जण मयत झाले आहेत.

तर शनिवारी पालिका हद्दीत नालासोपारा पूर्वेतून 2 आणि विरार पूर्व -1 असे मिळून 3 रुग्ण मुक्त झाल्याने आता या मुक्त रुग्णाची एकूण संख्या ही 104  वर गेली आहे. तर आजवर 88 बाधित रुग्णावर  वसई, नालासोपारा आणि मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत      दि.9 मे 2020 शनिवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारीविरार -7 पुरुषनालासोपारा -2 पुरुष ,2 महिलाविरार -2 पुरुष  एकूण रुग्ण संख्या  -11वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -200कोरोना मुक्त संख्या :- 104कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 8उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-88

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस