शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

coronavirus: वसई-विरारकरांना मिळणार राेज 185 दशलक्ष लीटर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 03:27 IST

coronavirus: वसई-विरार महापालिका हद्दीत काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच पालिका हद्दीत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली.

विरार : वसई-विरार महापालिका हद्दीत काही दिवसांपासून पाण्याचा तुटवडा निर्माण झाला असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी तसेच पालिका हद्दीत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत शुक्रवारी बैठक घेतली. सूर्या टप्पा ३ मधून १८५ एमएलडी पाणी २०२२ मध्ये वसई-विरारकरांना मिळणार असल्याचे ही योजना राबवत असलेल्या एमएमआरडीएकडून या वेळी स्पष्ट करण्यात आले. देहर्जे धरण प्रगतिपथावर असल्याने त्याचेही पाणी मिळणार आहे, असे या बैठकीत सांगण्यात आल्याने वसई-विरारकरांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. आयुक्तांनी घेतलेल्या पाणी आढावा बैठकीसाठी माजी महापौर प्रवीण शेट्टी, नारायण मानकर, प्रफुल साने, महेश पाटील, पंकज ठाकूर, परिवहन सभापती प्रीतेश पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड, जलसंपदा विभाग खोलसा पाडा २ चे कार्यकारी अभियंता एन. डी. महाजन, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये खोलसा पाडा धरण १ व देहर्जे धरण याबाबतही चर्चा करण्यात आली. या कामाबाबतची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव , एमएमआरडीएचे ह. स. सोनावणे यांनी दिली. या बैठकीत अमृत पाणीपुरवठा योजना व ६९ गाव योजनेमधील महापालिका क्षेत्रात समाविष्ट ५२ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. तसेच महापालिकेच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेवर खंडित होणारा वीजपुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावरील उपाययोजनांबाबत एमएसईबीचे उपकार्यकारी अभियंता संजय कोल्हे यांनी माहिती दिली. १० एप्रिलपासून कामाला सुरुवातपालिकेच्या मालकीच्या खोलसापाडा धरणाला वनविभागाची परवानगी मिळाली असून या धरणाला ५१.३९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ३१ ऑगस्ट २०१९ ला ही जागा पालिकेच्या धरणासाठी शासनाने आरक्षित केली हाेती तर पालिकेने १९ सप्टेंबर २०१८ ला धरण बांधण्यासाठी ठराव केला होता. कोकण पाटबंधारे विभाग ही योजना राबवत असून यातून पालिकेला १७ द.ल. लिटर पाणी मिळणार आहे. धरण २ बाबत सविस्तर चर्चा झाली असून वनविभागाने करायची कार्यवाही लवकर पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले व कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग महाजन यांनी १० एप्रिलपासून सदरचे काम सुरू होईल, असे सांगितले.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार