शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus वसईत आणखी दोघांना करोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 17:35 IST

निळेगाव परिसरातील आशिर्वाद इमारतीत राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये आज करोनाची लक्षणे दिसून आली.

प्रतिक ठाकुर 

विरार : वसई-विरार शहरात करोनाचा शिरकाव उशिरा झाला असला तरी, आता मात्र बाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहेत. नालासोपारा पश्चिमेत करोनाची दोन रुग्ण आढळून आली आहेत.हे दोन्ही ही रुग्ण एकाच घरातील आहेत. या रुग्णाची आता कस्तुरभा रुग्णालयात तपासणी सुरु आहे. दरम्यान या घटनेने शहरात करोना बाधितांचा आकडा आठ वर पोहोचला आहे.

 निळेगाव परिसरातील आशिर्वाद इमारतीत राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये आज करोनाची लक्षणे दिसून आली. यामधील पुरुष हा मुंबईच्या जसलोक रुग्णालयात काम करत होता. लॉकडाऊनच्या दरम्यान ही अत्यावश्यक सेवा चालु असल्याने हा व्यक्ती बसद्वारे रुग्णालयातही जाऊन आपली सेवा बजावत होता. त्यामुळे रुग्णालयात काम करता-करता त्याला करोनाची लागण झाली आहे. तसेच घरी आल्यावर या व्यक्तीचा पत्नीशी संपर्क झाल्याने तिलाही करोनाची लागण झाली.

दरम्यान दाम्पत्याला जेव्हा करोनाची लक्षणे दिसून आली त्यावेळी त्यांनी महापालीकेला या संदर्भात माहिती दिली. महापालिकेने यावेळी त्याची तपासणी करून दाम्पत्याला कस्तुरभा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर पालिकेतर्फे या व्यक्तीच्या सोबत राहणारा त्याचा मुलगा व सुनेला हॉटेलमध्ये विलग (हॉटेल क्वारंटाईन) करण्यात आले आहे. यानंतर पालिकेतर्फे संपूर्ण परिसरात जंतूनाशक फवारणी करून सॅनिटाइज करण्यात आला आहे. तसेच या  घटनेने शहरात करोना बाधितांचा आकडा आठ वर पोहोचला आहे.

 सदर इसम हा जसलोक रुग्णालयात काम करत आहे. त्याला रूग्णालयाच्या कामा दरम्यान करोनाची लागण झाली. तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या पत्नीमध्येही करोनाची लक्षणे दिसून आली आहेत. या दोघांना कस्तुरभा रुग्णालयात पाठवले आहे. तसेच या व्यक्तीच्या मुलगा व सुनेला हॉटेल क्वारंटाईन केले आहे.

-संतोष मुने सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती ई

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस