शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: तुंगारेश्वर तीर्थक्षेत्र श्रावणात भक्तजनांसाठी बंद, १०० वर्षांत प्रथमच भक्तीची परंपरा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 23:57 IST

कोरोनाने वसई तालुक्यात थैमान घातले आहेत. सुमारे पाच हजारांच्या अधिक नागरिकांना या आजाराने ग्रासले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही.

नालासोपारा : वसई तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले तुंगारेश्वर देवस्थान सध्या बंद आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी येत्या श्रावण महिन्यातही ते बंदच ठेवावे, अशी मागणी मंदिर समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे १०० वर्षांत पहिल्यांदाच श्रावण महिन्यातही मंदिर बंद राहणार असल्याने भक्तीची परंपरा खंडित होणार आहे.कोरोनाने वसई तालुक्यात थैमान घातले आहेत. सुमारे पाच हजारांच्या अधिक नागरिकांना या आजाराने ग्रासले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही. वसईतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले तुंगारेश्वर पर्वत सध्या पर्यटनासाठी आणि भाविकांना दर्शनासाठी खुले न करण्याची विनंती तुंगारेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीने जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या पत्रात तुंगारेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सध्यस्थितीत तुंगारेश्वर पर्वत भाविक व पर्यटकांसाठी खुले न करण्याचे सुचवले आहे. १८ मार्चपासून तुंगारेश्वर मंदिर बंद असून ६ जुलैपासून अन्य धर्मियांचा श्रावण सुरू होत आहे. तसेच मराठी महिन्यांप्रमाणे श्रावण मास २० जुलैपासून सुरू होत आहे. श्रावण महिन्यात तर प्रत्येक रविवार व सोमवारी श्री तुंगारेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी सुमारे १० ते १५ हजार भाविक येत असतात. तसेच पर्यटकसुद्धा येत असतात.एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसे मंदिरात एकत्र आल्यास कोरोना अधिक पसरण्याची शक्यता आहे. याची जबाबदारी कोण घेणार? तसे होऊ नये म्हणून तुंगारेश्वर देवस्थान विश्वस्थ मंडळाने जिल्हाधिकाºयांना सध्याच्या आपत्ती काळात मंदिर खुले करू नये, असे आवाहन केले आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उद्देशाने तुंगारेश्वर पर्वत सध्या पर्यटक आणि भाविकांना दर्शनासाठी खुले न करण्याचे तुंगारेश्वर मंदिर व्यवस्थापन समितीने जिल्हाधिकारीडॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सांगितले आहे.- पुरुषोत्तम पाटील,अध्यक्ष, तुंगारेश्वर मंदिर व्यवस्थापन समिती

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या