शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: तीन वर्षांच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 05:04 IST

या वेळी तिच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिला आनंदी वातावरणात निरोप दिला.

कासा/डहाणू : डहाणू तालुक्यातील पहिली कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली गंजाड येथील तीन वर्षीय मुलगी कोरोनामुक्त झाल्याने रविवारी तिला घरी सोडण्यात आले. या वेळी तिच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिला आनंदी वातावरणात निरोप दिला. तालुक्यातील हा पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून या मुलीची नोंद झाली होती.गंजाड गावच्या दसरापाडा येथील कातकरी कुटुंबातील ही तीन वर्षीय मुलगी कोरोनामुक्त झाल्याने रविवारी तिला घरी सोडण्यात आले. उपस्थितांनी टाळ्या वाजावून तिला निरोप दिला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंगणे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग, गटविकास अधिकारी बी. एच. भारक्षे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप गाढेकर आदी उपस्थित होते.विशेष म्हणजे, या चिमुकलीच्या आईवडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे उघड झाले आहे. पालघर तालुक्यातील कटाळे गावच्या वीटभट्टीवर तिचे कुटुंबीय रोजगारासाठी स्थलांतरित झाले होते. मासवण, कासा उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, तिच्या सातव्या, तेराव्या आणि चौदाव्या दिवशी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला होता.>७ जणांवर उपचार सुरूतिच्या संपर्कात आलेल्या २२४ पैकी ७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस