शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

Coronavirus : ५० टक्के प्रवासी भरण्याचे आदेश, एसटीचे चाक आणखी आर्थिक गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 2:00 AM

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने एसटी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे.

- हितेन नाईकपालघर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसमध्ये फक्त ५० टक्केच प्रवासी घेण्याचे शासनाचे आदेश एस.टी. विभागाच्या आर्थिक उत्पनावर घाला घालणारे ठरणारे आहेत. आर्थिक उत्पनाच्या चक्रव्यूहात आधीच रुतलेले एसटीचे चाक या आदेशाने अधिक खोलवर रुतणार आहे. या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याचे आव्हान आता पालघर परिवहन विभागासमोर उभे ठाकणार आहे.कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्याच्याशी अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने रेल्वे, मेट्रो, एसटी बसेस, खाजगी बसेस आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे. एस.टी.मधील उभ्या असणाऱ्या प्रवाशांना आता एस.टी.मध्ये प्रवेश नाकारला जाणार असून क्षमतेपेक्षा अर्ध्या (फक्त २१) प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे.पालघर परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ आगार असून या आगारांतून दररोज एस.टी. बसच्या ३ हजार ३७४ फेºयासह १ लाख ४३ हजार किमीचा प्रवास केला जात असून यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाखांचे उत्पन्न मिळत असते. पालघर आगारातून ६९२ फेºयाद्वारे दररोज २१ हजार १३८ किमीचा प्रवास पार केला जातो तर सफाळे आगराच्या ४२७ फेऱ्यांद्वारे ७ हजार ६७६ कि.मी., वसई आगराच्या ३५८ फेºयांद्वारे २० हजार १४५ किमी, अर्नाळा आगाराच्या २९८ फेºयांद्वारे २२ हजार ६५५.४ किमी, डहाणू आगाराच्या ४४५ फेºयांद्वारे १६ हजार ०.४०.६ किमी, जव्हारच्या ४५७ फेºयांद्वारे १९ हजार ६३६.३ कि.मी., बोईसर आगाराच्या ५५५ फेºयांद्वारे २२ हजार ०३८.२ किमी आणि नालासोपाराच्या १४६ फेºयांद्वारे १३ हजार ८८७ कि.मी.चा प्रवास पार पाडत एस.टी.चे चालक आणि वाहक एस.टी. विभागाला सुमारे ४५ लाखाचे उत्पन्न मिळवून देत आहेत.१० लाख रुपयांचा तोटापालघर जल्ह्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केल्याने एस.टी. बसने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांची मोठी संख्या घटली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या बसेस, लग्न समारंभ, राजकीय समारंभ, धार्मिक समारंभ, यात्रा रद्द करण्यात आल्याने प्रवासी घटले असून गुरुवारी पालघर विभागाला सुमारे १० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती एस.टी.चे विभागीय नियंत्रक आशीष चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी