शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: महाराष्ट्र-गुजरात सीमाभागातील गावे स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन, वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे गावांमध्ये नियमांचे बंधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 02:08 IST

जुलैच्या प्रारंभीच गुजरात औद्योगिक वसाहतीत जाणाºया बोर्डीतल्या कामगाराला कोरोनाची लागण झाली. सीमाभागातील या पहिल्या रुग्णानंतर रामपूर आणि चिखले गावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली.

- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : महाराष्ट्र-गुजरात सीमाभागात कोरोना रुग्ण वाढल्याने त्याचा फैलाव रोखण्यासाठी विविध ग्रामपंचायतींनी स्वयंस्फूर्तीने गावांत नियमांचे बंधन घातले आहे. त्यानुसार सकाळी ठरावीक वेळेत, निर्बंधांसह नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीची सूट दिली आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाईबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.डहाणू तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण डोंगरी भागातल्या गंजाड गावातल्या तीन वर्षीय मुलीच्या माध्यमातून नोंदवला गेला. त्यानंतर कासा आणि रानशेत येथेही रुग्णसंख्या आढळली. डहाणू नगरपालिका क्षेत्रातील सतीपाडा येथे सागरी भागातला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर नरपड, वाढवण येथे अन्य रुग्ण नोंदविले गेले. तर डहाणू शहरातील पतीच्या आत्महत्येच्या आरोपावरून अटक पत्नी आणि तिच्या प्रियकरामार्फत संसर्ग होऊन अनेक पोलिसांना बाधा झाली. मात्र तालुक्यातील सीमाभागातल्या गावांमध्ये एकही रुग्ण नव्हता.जुलैच्या प्रारंभीच गुजरात औद्योगिक वसाहतीत जाणाºया बोर्डीतल्या कामगाराला कोरोनाची लागण झाली. सीमाभागातील या पहिल्या रुग्णानंतर रामपूर आणि चिखले गावात प्रत्येकी एका रुग्णाची भर पडली. त्यांच्या सान्निध्यातील शंभर जणांना क्वारंटाइन करण्याची वेळ आल्यावर, बोर्डी गावातील ही संख्या ७०च्या घरात असल्याने, विश्रामधाम येथे नव्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाची उभारणी करावी लागली. एकीकडे प्रतिबंधित क्षेत्राच्या निर्मितीत प्रशासन व्यस्त असताना बोर्डी, रामपूर आणि चिखले ग्रामपंचायतीने स्वयंस्फूर्तीने गावांत लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे लागू करण्याचा लागलीच ठराव घेतला. त्यानुसार सकाळच्या सत्रात ठरावीक काळासाठी काही निर्बंध लागू करून दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. त्या वेळेनंतर नियमबाह्य दुकाने उघडणाºयावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.डबल सीट प्रवाशांवर कारवाई कराजुलैच्या प्रारंभीच बारडा यात्रेला भक्तांनी जाऊ नये म्हणून, स्वयंशिस्तीसाठी अस्वाली आणि जांबुगाव ग्रामपंचायतीने बंद लागू केला होता. त्यामुळे सीमाभागात उशिरा का होईना कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रारंभ झाला हे सकारात्मक लक्षण आहे.फक्त दुचाकींवर डबल सीट तर चारचाकीत गर्दी करून फिरणाऱ्यांवर कारवाईसह विनापरवाना वाहनचालकांविरुद्ध आरटीओ आणि पोलिसांनी मोहीम उघडणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार