शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: RTPCR तपासणीसाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर रांगा; तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 05:28 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अच्छाड येथे सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर अहवाल नाहीत, त्यांना पुन्हा माघारी पाठविण्यात येत आहे.

सुरेश काटेतलासरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता इतर राज्यांतून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकरिता आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे. यामुळे शनिवारी  सकाळी सात वाजेपासून गुजरात, दमण आणि दादरा नगर हवेली येथून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली असून, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड येथे उभारलेल्या तपासणी नाक्यांमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अच्छाड येथे सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली जात आहे. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर अहवाल नाहीत, त्यांना पुन्हा माघारी पाठविण्यात येत आहे. राजस्थान आणि गुजरात राज्यातील सीमा तपासणी नाक्यावर प्रवाशांची तपासणी सुरू आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिल्ली, राजस्थान व गुजरात राज्यातील महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सीमा तपासणी नाका अच्छाड, खानवेल येथे सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड सीमा तपासणी नाक्यावर पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली असून, वाहनांतील प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग सर्वाधिक वर्दळीचा मानला जातो. मोठ्या प्रमाणात या महामार्गांवरून दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि इतर राज्यांतून प्रवासी महाराष्ट्रात येत-जात असतात. त्यामुळे राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून होणारा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत.

महाराष्ट्राच्या हद्दीवर  छोट्या वाहनांतील प्रवाशांचा निगेटिव्ह अहवाल बघूनच त्यांना सोडले जात आहे. मोठ्या वाहनचालकांची तपासणी दापचरी तपासणी नाका येथे केली जात आहे. - अजय वसावे, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस