शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: २१ किमीची पायपीट करून बजावतात कर्तव्य; एसटी बसच्या चालकाचं सर्वत्र कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 00:10 IST

राठोड आपल्या कुटुंबासह मनोर येथे राहतात. लॉकडाऊन असल्याने कर्तव्यावर हजर होण्यासाठी त्यांना २१ किमीचा पायी प्रवास करावा लागतो. र

आरीफ पटेलमनोर : कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेसना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. यातीलच एक मनोर येथील देविदास जयसिंग राठोड (५५) हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील वाहक. या संकटाच्या काळात देविदास हे २५ डॉक्टर आणि नर्स यांना केईएम रुग्णालयात पोहोचवतात. हे कर्तव्य बजावण्यासाठी त्यांना अनेकदा मनोर ते पालघर अशी २१ कि.मी.ची पायपीट करावी लागते आहे.

राठोड आपल्या कुटुंबासह मनोर येथे राहतात. लॉकडाऊन असल्याने कर्तव्यावर हजर होण्यासाठी त्यांना २१ किमीचा पायी प्रवास करावा लागतो. रस्त्यावर एखाद्याने लिफ्ट दिली, तर त्यांना थोडा आराम मिळतो. दुपारी ३ वाजता दादर येथून बस घेऊन सायंकाळी ५ वाजता पालघरला पोहोचतात. त्यानंतर, त्यांचा पुढील मनोर येथे २१ किमीचा प्रवास सुरू होतो. आपल्या घरापासून ते पाण्याच्या दोन-तीन बाटल्या घेऊन पायी पालघरच्या दिशेने निघतात. पालघर बस डेपोचे मॅनेजर नितीन चव्हाण यांनीही राठोड यांच्या कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले आहे.डॉक्टर आणि नर्सेस हे माझे दैनंदिन प्रवासी आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ते आपले महत्त्वाचे योगदान देत आहेत. यामुळे मी त्यांना असे सोडू शकत नाही, असे राठोड यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या