शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

coronavirus: पालघर जिल्ह्याला मनुष्यबळ, निधी कमी पडू दिला जाणार नाही - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:46 IST

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम डहाणू तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्युदर १.३ टक्के असून औषधे व साहित्याबाबत प्रशासन स्वयंपूर्ण आहे. जिल्ह्यात एकही व्हेंटिलेटरचा वापर केला न गेल्याने पालघरमधील आशादायक चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसावे, अशी आपण प्रार्थना करीत असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालघर येथे सांगितले.गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रथम डहाणू तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यातील आजाराची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत मृत्युदर कमी असून कोरोनाबाधितांच्या बरे होण्याच्या टक्केवारीबाबत समाधान व्यक्त केले. आरोग्य विभागाकडे ६० व्हेंटिलेटर असून एकाही व्हेंटिलेटरची गरज रुग्णाला भासली नसल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.जिल्ह्यात वसई, पालघर आदी दाटीवाटी असलेल्या भागात कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आल्याने स्वच्छ हवामान, प्रदूषण-विरहित हवामानाचा यावर काय परिणाम होतो का? याबाबत अभ्यास करण्याच्या सूचना आपण दिल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. डायबेटीजचे रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडत असल्याचे मी मानत नाही, असे सांगून जिल्ह्यातील आशादायक असलेले चित्र आपल्या वृत्तपत्रात मांडा, असाही सल्ला आव्हाड यांनी या वेळी दिला.पालघर मध्ये उभे राहात असलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या इमारतीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असून मी त्या विभागाचा मंत्री अथवा पालघरचा पालकमंत्री नसल्याचे सांगून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालकमंत्री दादा भुसेंकडे अंगुलीनिर्देश केले. निकृष्ट दर्जाच्या इमारतीबाबत नामदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र दौरा करून या तक्रारींची शहानिशा करू, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार