शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Vasai-Virar : वसई-विरारमधील कोरोना रुग्णांची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 00:48 IST

रुग्णांना तसेच विलगीकरण कक्षातील संशयितांना योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

- प्रतीक ठाकूरविरार : वसई-विरार महानगरपालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नालासोपारातील कोरोनाबाधितांचे दीड शतक, विरार शहराचे शतक तर वसई शतकाच्या उंबरठ्यावर अशी स्थिती आहे. रुग्णांना तसेच विलगीकरण कक्षातील संशयितांना योग्य सुविधा मिळत नसल्याने त्यांची हेळसांड होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गेले असताना महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सुरक्षारक्षकांना सांगून पालिकेबाहेर काढल्याचा गंभीर आरोप एका नगरसेविकेने केला आहे.नालासोपारा येथील रिद्धिविनायक हॉस्पिटल व विरार येथील म्हाडाच्या विलगीकरण सेंटरमध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रिटा सरवैया यांनी या तक्रारी आयुक्तांच्या कानावर घातल्या. मात्र आयुक्तांनी या तक्रारींना काय आधार आहे, असा प्रश्न केला. खासगी रुग्ण आणि पालिकेने दाखल केलेल्या रुग्णांत भेदभाव होत असल्याचे सरवैया यांनी सांगितले. म्हाडातील विलगीकरण सेंटरमध्येही अशीच अवस्था असल्याचे सांगितले. त्यावर आयुक्तांनी सरवैया यांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर रुग्ण दगावल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सरवैया यांनी केला असता, संतापलेल्या आयुक्तांनी सुरक्षारक्षकांना बोलावून सरवैया यांना बाहेर काढण्यास सांगितले. यासंदर्भात आयुक्तांची बाजू घेण्यासाठी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.वसई-विरार शहरांत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहर ‘रेड झोन’मध्ये आहे. अशा कठीण काळात आयुक्तांनी लोकप्रतिनिधींशी समन्वय साधत; त्यांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित होते. म्हाडा येथील विलगीकरण सेंटरमध्ये जेवण-पाणी मिळत नाही. त्यांच्या तक्रारी, म्हणणे ऐकून घेणे हे प्रशासनाचे काम आहे. आयुक्तांनी लोकप्रतिनिधींचा अपमान करणे योग्य नाही. मी या आयुक्तांविरुद्ध तक्रार करणार आहे.- रीटा सरवैया, नगरसेविका

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस