शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मीरा भाईंदरमधील नागरिकांना 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांमुळे दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 15:19 IST

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आमदार गीता जैन यांनी त्यांच्या आमदार निधीमधून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत.

मीरारोड : मीरा भाईंदरमधील कोरोनाग्रस्त नागरिकांसाठी आमदार गीता जैन यांच्या आमदार निधीतून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे मिळाले आहेत . यामुळे श्वास घेण्यास शक्य नसणाऱ्या अतिगंभीर रुग्णांना दिलासा मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे. 

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यास अडथळा होत असल्याने त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सुविधा पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयासह प्रमोद महाजन सभागृह रुग्णालयात करण्यात आली आहे. परंतु श्वास घेणे अगदीच अशक्य असणाऱ्या व जास्त प्रमाणात ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना दुसरा पर्याय नसल्याने व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. त्यामुळे व्हेंटिलेटर अतिगंभीर रुग्णांसाठी अनेकवेळा रिकामी मिळत नाही . 

कोरोनाच्या रुग्णांना ऑक्सिजनची लागणारी गरज पाहता आमदार गीता जैन यांनी त्यांच्या आमदार निधीमधून १० 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रे महापालिकेला उपलब्ध करून दिली आहेत. सुमारे ३० लाखांचा खर्च या  'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रांसाठी झालेला आहे. भीमसेन जोशी कोरोना रुग्णालयात सदर यंत्रे देण्यात आला आहेत. यावेळी आमदार गीता जैन यांच्या सह आयुक्त डॉ. विजय राठोड, नगरसेवक अश्विन कासोदरिया, माजी नगरसेवक ओमप्रकाश अग्रवाल आणि प्रतिभा पाटील, डॉ. सुरेश येवले, रिया म्हात्रे, नारायण नांबियार , वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. 

या 'हाय-फ्लो ऑक्सिजन' यंत्रामुळे जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना या यंत्राचा मोठा उपयोग होणार आहे. शिवाय व्हेंटिलेटरची गरज न भासल्याने त्याचा वापर अन्य गरजू रुग्णांसाठी करता येणार आहे, असे आमदार गीता जैन म्हणाल्या. 

टॅग्स :mira roadमीरा रोडcorona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayanderमीरा-भाईंदर