शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
4
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
5
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
6
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
7
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
8
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
9
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
10
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
11
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
12
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
13
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
14
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
15
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
16
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
17
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
18
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
19
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
20
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

CoronaVirus News: वसई-विरारमध्ये २१,३९८ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 12:43 AM

धास्तावलेल्या वसईकरांना दिलासा; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

वसई/पारोळ : वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच आता परिस्थितीत बदल होत आहे. मध्यंतरी कोरोनाचा वेग वाढण्याबरोबरच मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली होती, मात्र आता कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत तब्बल २१ हजार ३९८ रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. यामुळे वसई-विरारकरांना दिलासा मिळाला आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २४ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार २३ हजार ६५४ रुग्ण आढळून आलेले आहेत.कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४६७ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच या जीवघेण्या आजारातून २१ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. वसई-विरारमधील कोरोनातून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण वाढल्याने मोठा दिलासा ठरला आहे.मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांचा वेग खूपच वाढला होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत होती. दिवसाला ४००-५०० बाधित रुग्ण आढळू लागल्याने सामाजिक संसर्गाचा धोका होता, परंतु आरोग्य यंत्रणेने पालिका हद्दीत रुग्ण आढळलेल्या भागांत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, गेल्या महिनाभरात सुमारे ६ हजार २७६ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. दि. ५ सप्टेंबर ते ६ आॅक्टोबर या कालावधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरार शहर महापालिकेने केलेल्या योग्य नियोजनामुळे महापालिकेतील रुग्णसंख्येचा वेग कमी होत आहे. तर कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याने आनंद व्यक्त होत आहे. सध्या पालिका हद्दीतील विविध रुग्णालयांमध्ये१ हजार ७८९ रुग्ण उपचार घेत आहेत.लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांमध्ये निष्काळजीपालघर जिल्ह्यातील वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील कामधंद्यानिमित्त मुंबई-ठाणे परिसरात जाणारे नागरिक मोठ्या संख्येने बाधित ठरले आहेत.जूनमध्ये वसई-विरार शहर महापालिकेने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर वसईकर कामाधंद्यानिमित्त बाहेर पडले. पालिका प्रशासनाने सुरक्षा आणि खबरदारी घेण्याचे आवाहन करूनही नागरिक खबरदारी घेत नाहीत. विनामास्क भटकणे, सामाजिक अंतर न पाळणे अशा सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासला जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या