शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

coronavirus: ‘कैसे भी करके गाव जाना है!’ वसई-विरारमधील मजूरांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 01:26 IST

‘कैसे भी करके गाव जाना है साहब, यहा भीक मांग कर खाने से अच्छा गांव में एक वक्त की रोटी मिलेगी तो सही...’ असे म्हणणाऱ्या मजुरांच्या गावी जाण्याच्या ओढीचा फायदा काही खाजगी वाहनांनी घेतल्याचे दिसते.

- प्रतीक ठाकूरविरार : परराज्यांतील अडकलेल्या मजुरांना गावी जाण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आपला नंबर कधी लागेल याची काहीही खात्री नसल्याने हातावर पोट असलेल्या मजुरांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची स्थिती बिकट आहे. हाल होण्याच्या भीतीने मजुरांचे लोंढेच्या लोंढे जीवघेणा प्रवास करून आपल्या गावी जाण्याची धडपड करू लागले आहेत. ‘कैसे भी करके गाव जाना है साहब, यहा भीक मांग कर खाने से अच्छा गांव में एक वक्त की रोटी मिलेगी तो सही...’ असे म्हणणाऱ्या मजुरांच्या गावी जाण्याच्या ओढीचा फायदा काही खाजगी वाहनांनी घेतल्याचे दिसते.तालुक्यातील संतोष भुवन, बिलालपाडा, डोंगरी, धानीव बाग, रामनगर, रामू कंपाऊंड, पेल्हार येथे मोठ्या प्रमाणात परराज्यातील मजूर राहतात. त्यांना आता हाताला काम नाही, जवळ पैसा नाही, यामुळे उपासमारीचे संकट ओढवले आहे. म्हणून जगण्यासाठी मिळेल तो मार्ग अवलंबून गावी जाण्याची त्यांची धडपड सुरू आहे.ज्यांना अत्यावश्यक सेवांचे पास मिळाले आहेत अशा वाहनांमधून रोज रात्री नालासोपारा पूर्व संतोष भुवन येथून मजूर पाठवले जातात. एका मजुराकडून ३००० रुपये घेऊन ६० ते ७० माणसे एका वाहनात कोंबून कोणतीही परवानगी न घेता त्यांना गावी घेऊन जात आहेत. यात टेम्पो, कंटनेर, लॉरी यांचा समावेश आहे. अशाच प्रकारे माणसांची वाहतूक करणारे तीन टेम्पो अलीकडेच माणिकपूर पोलिसांनी पकडले होते. तरीही अशी वाहने दररोज या परिसरातून रात्रीच्या वेळी भरली जात आहेत. यात महिला, वृद्ध, लहान मुलांचाही समावेश असतो.दोन महिन्यांपासून खिचडी खात आहोत. त्याचीही चव नकोशी झाली आहे. हाती काम नाही. इथे कुणी वाली नाही. मागून कधीपर्यंत खाणार? त्यापेक्षा गावी गेलो तर कुटुंबाबरोबर एक घास खाऊन जगू.- जय वर्मा, मजूरआॅनलाइन अर्ज करून आठवडा झाला तरी काही झाले नाही, यामुळे ज्या पद्धतीने जाता येईल, त्या पद्धतीने आम्ही गावी जात आहोत. मोबाइल अथवा कोणत्याही किमती वस्तू देऊन भाडे भरत आहेत. इथे खायला मिळते, पण गावी परिवाराचे पोट कसे भरणार म्हणून कसेही आम्हाला गावी जायचे आहे. - रवी यादव, मजूर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार