शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: वसईतील संतप्त फेरीवाल्यांची अधिकारी-पोलिसांवर दादागिरी, महापालिकेच्या कारवाईत अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 01:14 IST

कोरोना प्रादुर्भावाची साखळी मोडण्यासाठी वसईतील अंबाडी, माणिकपूर आणि दीनदयाळनगर येथे फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती.

नालासोपारा : लॉकडाऊनचे नियम मोडून दाटीवाटीने बसलेल्या फेरीवाल्यांनी रस्त्यावर हंगामा करून पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनाच दादागिरी करीत रस्त्यावर भाज्या फेकून देण्याची घटना वसईत गुरुवारी घडली आहे.कोरोना प्रादुर्भावाची साखळी मोडण्यासाठी वसईतील अंबाडी, माणिकपूर आणि दीनदयाळनगर येथे फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करण्यात आली होती. त्यानुसार अंबाडी आणि माणिकपूर येथील फेरीवाल्यांनी बाजार बंद ठेवला होता, मात्र, दीनदयाळनगर येथील फेरीवाल्यांनी महापालिकेचा आणि शासनाचा नियम धुडकावून गुरुवारी बाजार भरवला होता. या बाजारात बसलेल्या अनेक विक्रेत्यांनी मास्क लावले नव्हते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा नियमही त्यांनी पायदळी तुडवला होता. तशी माहिती मिळाल्यावर नवघर माणिकपूर विभागीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिल्सन गोन्साल्वीस यांनी कारवाईसाठी एक पथक पाठवले होते. या पथकासोबत पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता.महापालिकेच्या पथकाने या फेरीवाल्यांना बाजार बंद करण्यासच्या सूचना दिल्यावरही त्यांनी आपला व्यवहार सुरूच ठेवला. त्यामुळे पालिकेच्या पथकाने त्यांचा माल जप्त करण्याची कारवाई सुरू केली. या कारवाईत अडथळा निर्माण करून फेरीवाल्यांनी स्वत:च भाज्या रस्त्यावर फेकून ‘रास्ता रोको’ केला. तसेच त्यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनाही अरेरावी करून दादागिरी केली. त्यामुळे येथील वातावरण काही काळ तंग झाले होते. या प्रकरणी गिल्सन गोन्साल्वीस यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार