शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : वसई -विरारमध्ये 5 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 96

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 23:05 IST

आजवर वसई विरार शहरात 18 जण रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना आजाराने आतापर्यंत 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देवसई -विरार शहरात बुधवारी 5 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झालीनालासोपारा पूर्वतील दोन नर्स कोरोना पॉझिटिव्हमुंबईतील नामांकित व मुंबई मनपा रुग्णालयातील त्या नर्स झाल्या बाधित

 वसई - वसई -विरार शहरात बुधवारी 5 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद झाली असून यात प्रामुख्याने नालासोपाऱ्याच्या दोन्ही महिला नर्सचा समावेश असून या दोघीहि मुंबईतील नामांकित व मुंबई मनपाच्या रुग्णालयात महिला नर्स म्हणून कार्यरत असल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या वतीनं लोकमत ला देण्यात आली.मंगळवार पर्यँत वसई- विरार शहरात कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या 91 झाली होती तर विरार मधील 42 वर्षीय रूग्णाचा मृत्य देखील मंगळवारीच मुंबईत उपचारादरम्यान झाला होता.मात्र बुधवारी हीच संख्या 96 वर पोहचली असून यामध्ये आजवर वसई विरार शहरात 18 जण रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना आजाराने आतापर्यंत 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार,नालासोपारा पूर्वेला कोरोना बाधीत 48 वर्षीय व 46 वर्षीय या दोघी महिला मुंबईत मनपा व एका नामांकित खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होत्या,त्या दोघीही पॉझिटिव्ह आढळून आल्या असून सोबत नालासोपारा पश्चिमेस एक 33 वर्षीय महिला देखील पॉझिटिव्ह आढळून आली आहे.तसेच नालासोपारा मध्ये 51 वर्षीय पुरुष रुग्ण हा मुंबईत भाजीपाला विक्री करायचा मात्र तो ही पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर नालासोपारा पश्चिमेतील एक 20 वर्षाच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाली असून त्याच्या कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळून आल्याने पालिकेच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे.दरम्यान दोनच दिवसापूर्वी नालासोपाऱ्यात एका २२ वर्षीय मुलाला देखील सारी रोगाची लागण होऊन तो बाधित झाला होता आता त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.नालासोपाऱ्यात कमी वयाच्या मुलांना लागण होण्याचे प्रकारामध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि वाढ चिंतेत टाकणारी आहे.एकूणच बुधवारी वसई तालुक्यात नव्याने आढळून आलेले सर्व रुग्ण नालासोपारा मधले असून या पाच हि रुग्णावर वसई- विरार व मुंबईत इतरत्र उपचार सुरू आहेत.बुधवारी पालिकेने दिलेली आकडेवारी जरी 96 अंकावर पोचली असली तरी वसई तालुक्याची वाटचाल लवकरच शंभरी पार करेल यात अजिबात शंका राहिलेली नाही .दि.22 एप्रिल 2020  बुधवारची कोरोना- रुग्णांची आकडेवारीनालासोपारा -3  महिला आणि 1  पुरुष आणि 1 मुलगा एकूण रुग्ण -5वसई विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -96कोरोना मुक्त संख्या :- 18कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 6उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-72

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार