शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडणार; कोरोनामुळे तुरुंगातील गर्दी कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 03:53 IST

सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे प्रयोजन असलेल्या सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे.

पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध तुरुंगांत असलेल्या कैद्यांना संसर्गाची लागण होऊ नये म्हणून सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडण्यात आले असून एकूण ११ हजार कैद्यांना सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघर येथे दिली.

पालघर येथील गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणाच्या घटनेच्या आढावाप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या राज्यातील अनेक भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्यातील विविध तुरुंगांपैकी आठ तुरुंगांमध्ये लॉकडाऊन काळात विशेष व्यवस्था केली आहे. या तुरूंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्याने सुनावणीदरम्यान त्यांनी केलेल्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेचे प्रयोजन असलेल्या सुमारे ५ हजार ५०० कैद्यांना यापूर्वीच तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले आहे. तसेच सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या मात्र गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी नसलेल्या अन्य ५ हजार ५०० अशा एकूण ११ हजार कैद्यांना तात्पुरत्या पॅरोलवर सोडून देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्यातील विविध तुरुंगांतील अकरा हजार कैद्यांची संख्या कमी होईल, असेही ते म्हणाले. मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या एका स्वयंपाकीला लागण झाली. त्याच्या संसर्गाने ७२ कैद्यांना लागण झाल्याचा अहवाल आल्याने राज्यातील आठ तुरुंगांत कुणालाही भेटण्यासाठी आत सोडले जात नाही, तसेच कुठल्याही कैद्याला तुरुंगाच्या बाहेर सोडले जात नसल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यात साडेतीन कोटींचा दंड वसूलराज्यात २ लाख २४ हजार २२९ रुग्णांना क्वारंटाइन करण्यात आले असून ४४९ क्वारंटाइन रुग्ण पळून गेले आहेत. त्यांच्यावर आणि भादंवि कलम १८८ चे उल्लंघन केलेल्या अन्य ९६ हजार २३१ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता मोटारसायकल घेऊन फिरणाऱ्या ५३ हजार ३३० लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ कोटी ५६ लाख ८१ हजार ९४७ रुपयांचा दंड वसूल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखPrisonतुरुंग