शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

Corona Virus: वापरलेल्या मास्कचा साठा सापडला कचराकुंडीत; पोलीस, आरोग्य यंत्रणेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 22:56 IST

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केली तपासणी

नितीन पंडितभिवंडी : वापरलेल्या मास्कचा बेकायदेशीर साठा भिवंडीतील एका गोदामात केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सरकारी यंत्रणेकडून चौकशी सुरू असतानाच, हा साठा पूर्णा ग्रामपंचायतीच्या हद्दीत कचराकुंडीत फेकून दिल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. कोरोना व्हायरसची सर्वत्र दहशत पसरत असताना मास्कचा काळाबाजार करण्याचा अज्ञात आरोपींचा उद्देश यंत्रणेने उधळवून लावला. सोशल मीडियाची सकारात्मक बाजू यानिमित्ताने दिसून आली.

जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना, या पार्श्वभूमीवर भारतातही तोंडाला लावण्याच्या मास्कची मागणी वाढली आहे. भिवंडी तालुक्यातील गोदामपट्ट्यात मोठ्या प्रमाणात परदेशातून भंगार साहित्य येते. त्यामध्ये परदेशांत वापरलेले मास्कसुद्धा मोठ्या प्रमाणात आले होते. सध्या बाजारात मास्कचा तुटवडा असल्याने वापरलेले मास्क धुऊन पुन्हा विक्र ीसाठी आणण्याचा गोदाममालकांचा घाट असल्याचा व्हिडीओ शनिवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांसह आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली.या व्हिडीओच्या आधारे ग्रामीण भागात यंत्रणेकडून तपास सुरू असताना, हे गोदाम वळ ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाउंडमधील एका इमारतीमध्ये असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांसह आरोग्य कर्मचारी शनिवारी रात्रीच गोदामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले; परंतु रात्रीच्या वेळी कुणीच नसल्याने पाहणी करता आली नाही. रविवारी सकाळी पंचायत समिती सदस्य विकास भोईर हे ग्रामस्थांसह या गोदामात गेले असता, तेथील कामगाराने मास्कचा माल पूर्णा ग्रामपंचायत हद्दीतील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइन शेजारी कचरा टाकण्याच्या जागेत टाकल्याची माहिती दिली.साठा नष्ट करण्याचे आदेशवापरलेले मास्क फेकून दिल्याने नेमकी कारवाई कुणावर आणि कुणी करायची, याबाबत अधिकाऱ्यांची बराच वेळ खलबते झाली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी मनीष रेंगे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून नारपोली पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली.

टॅग्स :corona virusकोरोना