शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: कोरोनाचा धसका! पोल्ट्री व्यावसायिक संकटात; जिवंत पिलांना खड्ड्यात गाडण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 23:15 IST

सात लाख अंडी व दीड लाख नवजात पिलांना खड्ड्यात गाडण्याची वेळ

कासा : कोरोना विषाणूच्या भीतीपोटी नागरिकांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवल्याने मोठ्या प्रमाणात चिकण विक्री कमी झाल्याने कुकुटपालन व्यवसायावर व परिणामी हॅचरी व्यावसायिकांवर मोठे संकट उद्भवले आहे. यंदाच्या होळीच्या हंगामामध्ये कोंबडीच्या चिकनला उठाव नसल्याने डहाणू तालुक्यातील एका हॅचरी मालकाने सात लाख अपूर्ण उबलेली अंडी तसेच पावणेदोन लाख नवजात कोंबड्यांची पिल्लांना नाईलाजाने जमिनीमध्ये पुरण्याची वेळ आली आहे.

पोल्ट्री व्यावसायिक डॉ. सुरेश भाटलेकर यांचा डहाणू तालुक्यातील गंजाड (ढाकपाडा) येथे हॅचरी व पोल्ट्री उद्योग असून सद्यस्थितीत त्यापैकी दहा शेडमध्ये सुमारे ९० हजार कोंबड्या विक्रीसाठी तयार अवस्थेमध्ये आहेत. त्यांना बाजारामधून आवश्यक प्रमाणात उठाव नसून कोंबडीच्या पिल्ल्यापासून सुमारे एक ते दीड किलोची कोंबडी ४० दिवसांच्या अवधीत तयार होत असून त्यावर कुकुटपालन केंद्राच्या मालकाकडून ७५ रुपयांचा खर्च होतो. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी मांसाहार व चिकण खाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच होळीच्या निमित्ताने होणारी खरेदी अपेक्षित प्रमाणात झाली नसल्याने या कुकुटपालन व्यावसायिकरण समोर संकट उभे राहिले आहे.

तालुक्यातील या हॅचरी व कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कोंबडीला उठाव नसताना नव्याने पिल्ले तयारीसाठी आलेली सुमारे सात लाख अंडी या हॅचरी मालकाने खड्ड्यामध्ये फोडून पुरली आहे. त्याचप्रमाणे डबघाईला आलेल्या कुक्कुटपालन व्यवसायात नव्याने निर्माण केलेल्या सुमारे दीड ते पावणेदोन लाख कोंबडीच्या पिल्लांना खाद्य देण्यासाठी पैसे नसल्याने अशा अपूर्ण वाढ झालेल्या नवजात पिलांना देखील खड्ड्यात पुरण्याची नामुष्की ओढावली आहे. या व्यवसायाला आगामी काळात मर्यादित प्रतिसाद लाभणार या शक्यतेपोटी हॅचरी कर्मचारी निम्म्यावर आणला असून नोकरीनिमित्ताने मराठवाडा व इतर ठिकाणाहून आलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी ओढवली आहे. त्याचप्रमाणे कुकुटपालन क्षेत्रात खाद्य म्हणून लागणाºया मक्याची मागणी कमी झाली असून त्याच्या दरांमध्ये देखील सुमारे सहा रुपये प्रति किलो अशी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. एक कोंबडी तयार करण्यासाठी साधारण प्रतिकिलो ७५ रुपये खर्च येत असून सध्या घाऊक बाजारपेठेत तालुक्यात १५ ते २० रुपये प्रति किलो इतक्या दराने जीवंत कोंबड्यांचे पक्ष्यांची विक्र ी होत असून कुकुटपालन व्यवसाय करणाºया तसेच हॅचरी उद्योगासमोर संकट उभे राहिले आहे.

दरम्यान हॅचिंगसाठी अंडी छत्तीसगड, हैदराबाद, बेंगलोर, औरंगाबाद येथून वेगवेगळ्या ठिकाणावरून व वेगवेगळ्या कंपनीकडून गंजाड (ढाकपाडा) येथे येत असून सदर अंडी उबवण्यासाठी १८ दिवस इनक्युबेटर व ३ दिवस हॅचरमध्ये ठेवून अशा २१ दिवसांत पिल्ले तयार होतात. मात्र चिकणमुळे कोरोना व्हायरस लागण होते. या अफवेमुळे चिकन मागणी घटल्याने अशी परिस्थिती हॅचारी व पोल्ट्री व्यावसायिकावर आली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी बाजारामध्ये चिकनला मागणी खूप कमी आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या उपलब्ध असल्याने तसेच यापुढे पक्ष्यांना मर्यादित मागणी लक्षात घेऊन नाईलाजाने उबविलेली साठवलेली अंडी व अपूर्ण वाढ झालेली पिले यांची विल्हेवाट लावणी करणे भाग पडत आहे. - डॉ. सुरेश भाटलेकर, पोल्ट्री व्यावसायिक, गंजाड

टॅग्स :corona virusकोरोना