शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

Corona vaccination: ड्रोनद्वारे लसीकरण मोहीम राबवण्याचे जव्हारला सर्व्हेक्षण, ठरला भारतातील प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:52 IST

Corona vaccination by drone in Jawhar: - ग्रामीण भागात वेळेवर लस पोहचावी व त्याचा फायदा तळागाळातील अतिदुर्गम आदिवासी भागाला मिळावा याकरिता ड्रोन द्वारे लसीकरण करण्याचा पहिले यशस्वी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.

- हुसेन मेमन जव्हार - ग्रामीण भागात वेळेवर लस पोहचावी व त्याचा फायदा तळागाळातील अतिदुर्गम आदिवासी भागाला मिळावा याकरिता ड्रोन द्वारे लसीकरण करण्याचा पहिली यशस्वी सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. या करिता नागरी वाहतूक उड्डाण मंत्रालय, दिल्ली यांची प्रथम मान्यता प्राप्त झाली असून, आणखीन चार विविध विभागांची मान्यता घेण्याचे काम सुरू आहे. 

 कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरातील आरोग्य यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच लसीकरण मोहीम वेगाने राबवण्याचे प्रयत्नही होत आहे, याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून लसीकरणासाठी चक्क ड्रोनचा वापर करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर जव्हार तालुक्याची निवड करण्यात आली आहे. भारतातील हा पहिला प्रयोग पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात होणार आहे. जव्हारच्या दुर्गम , अतिदुर्गम भागात लसीकरण करण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरण्याचा दावा करण्यात आला आहे.

जव्हार तालुक्यात लसीकरण ड्रोनने करता यावे यासाठी केंद्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा व या गावांचा सर्व्हेक्षण केला जाणार आहे . त्यानंतर जिल्हा आरोग्य प्रशासनाशी चर्चा करून , नंतरच जव्हार येथे लशींचा साठा एकाच ठिकाणी उपलब्ध करून ड्रोनच्या माध्यमातून तो डोंगराळ परिसर , दुर्गम , अतिदुर्गम भागात पोहोचवला जाईल . त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना तशा सूचना देण्यात येणार आहेत . एकूणच नागरिकांना लस कशी उपलब्ध करून देता येईल , यावर भर देण्याचा प्रयत्न होत आहे . ड्रोनला २५ किलोमीटर अंतरात फिरण्याची परवानगी असल्याने पहिला प्रयोग हा जव्हार तालुक्यात केला जाणार आहे.

तो यशस्वी झाल्यावर नंतर अन्य ठिकाणी देखील लसीकरण मोहीम हाती घेतली जाईल . जिल्हा आरोग्य प्रशासनाने जव्हार तालुक्यातील गावांची माहिती केंद्राकडे दिली आहे . त्यानुसार कशापद्धतीने लसीकरण करायचे , याचा निर्णय घेऊन तसे पत्र आरोग्य विभागाला दिले जाणार आहे . लसीकरणासाठी मुंबई नॅशनल हेल्थ मिशनला परवानगी देण्यात आली असून , एक वर्ष ही मोहीम त्यांच्यामार्फत हाती घेण्यात येणार आहे .

अतिदुर्गम आदिवासी भागात लसीकरण करण्यासाठी ड्रोनद्वारे  लसी पोहचवण्यात येणार असून, तसा प्राथमिक प्रयोग जव्हार तालुक्यात करण्यात येणार असल्याचे शासनस्तरावर सर्व्हेक्षण सुरू आहे. केंद्राकडून मान्यता मिळाल्यानंतर लसीकरण मोहीम सुरू होईल. - डॉ.किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, जव्हार

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसpalgharपालघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस