शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

पोस्टात ठणाणा; एटीएम कोरडी, सर्वत्र बोंबाबोंब!

By admin | Updated: November 12, 2016 06:23 IST

शुक्रवारीही पालघर जिल्ह्यात पोस्टातील रक्कम संपली. एटीएम कोरडी पडली. तर बँकांमध्ये नोटा बदलून देण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने संपूर्ण जिल्ह्यात बोंबाबोंब सुरू होती

शुक्रवारीही पालघर जिल्ह्यात पोस्टातील रक्कम संपली. एटीएम कोरडी पडली. तर बँकांमध्ये नोटा बदलून देण्याचे काम कासवगतीने सुरू असल्याने संपूर्ण जिल्ह्यात बोंबाबोंब सुरू होती. सराफांनी जुन्या नोटा घेऊन अव्वाच्या सव्वा दराने सोने विक्री केल्याने त्यांची चांदी झाली. परंतु रोजंदारी आणि आठवडी तत्वावर ज्यांना मजुरी अथवा पगार दिला जातो व ज्यांचे पोट हातावर असते त्यांचा खिसा मात्र कोरडाच राहिला. आता आठवडाभर खायचे काय? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. रांगेत उभे असलेल्यांपैकी निम्म्याच व्यक्तींना पैसे मिळाल्याने बाकीच्यांवर दिवसही फुकट गेला आणि पैसेही मिळाले नाहीत म्हणून जळफळाट करण्याची वेळ आली. बाजारपेठात सर्वत्र शुकशुकाटच होता. असेच चित्र जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावात होते.शशी करपे, वसईवसई विरार नालासोपाऱ्यात नव्या नोटा मिळवण्यासाठी दुसऱ्यादिवशीही सकाळपासूनची ठिकठिकाणी मोठ्या रांगा लागल्या होत्या. सकाळी बंद असलेली एटीएम दुपारी सुरु होती. येथील पोस्टात दुसऱ्या दिवशीही रक्कम दिली गेली नाही. जुन्या नोटा घेण्यास सुरुवात केल्याने पालिका कार्यालयांमध्ये घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यासाठी रांगा लागल्या. सायंकाळी ६.३० पर्यंत ४ कोटींहून अधिक घरपट्टी केवळ शुक्रवारी जमा झाली होती. पेट्रोलपंपांवर मात्र ग्राहकांची अडवणूक होत होती. पहाटेपासूनच बँकांच्या दाराजवळ नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. विरार आणि वसईमधील अनेक बँकांमधील रोकड दुपारी दोन वाजता संपल्याने लोक ताटकळत उभे होते. तालुक्यातील बहुतेक एटीएम मशीन्स आजही बंद होत्या. काही एटीएम मशीन दुपारपासून सुुरु करण्यात आल्या होत्या. सर्वसामान्यांचा पगार दहा तारखेपर्यंत होतो. हातावर पोट असणाऱ्या मजुरांनाही १० तारखेलाच पगार किंवा खर्ची दिली जाते. त्यानंतर विज बिल, वाण्याचे बिल, घराचे मेटेंनन्स, दुधवाला, पेपरवाला,लाँन्ड्रीवाला,मोलकरीण,यांची बिले वा पगार चुकता केला जातो. मात्र ही बिले चुकते करण्यासाठी सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. ८ तारखेला मध्यरात्रीपासून मोदी सरकारने पाचशेच्या आणि हजाराच्या नोटांवर बंदी घातल्याचे जाहीर केल्यामुळे ९ तारखेपासून कोणीही या नोटा घेण्याचे कटाक्षाने टाळले. त्यामुळे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फटका सुरवातीला मात्र, सर्वसामान्यांनाच बसू लागला आहे.पगारातून आलेल्या पाचशेच्या किंवा हजाराच्या नोटा सर्वांची देणी फेडण्यासाठी सोप्या ठरतात.याच नोटावर बंदी घातल्यामुळे कोणाचीही देणी न फेडता, त्या बदलून स्वखर्चासाठी शंभराच्या नोटा घेण्यासाठी सर्व कामे बाजूला ठेवून किंवा आॅफिसला दांडी मारून रांगा लावण्यासाठी पाळी हजारो लोकांवर आली आहे. त्यातच महावितरणाने पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे विजेचे बिले हजारो ग्राहकांना मुदतील भरता आले नाही. महापालिकेनेही हीच नकार घंटा काल वाजवल्यामुळे मालमत्ता कर न भरताच नागरिकांना परतावे लागत होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महावितरणला जुन्या नोटा घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे वसईतील वीज बिल भरणा केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. महापालिकेनेही शुक्रवारी जुन्या नोटा घेण्यास सुरुवात केल्याने पालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये लोकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी एका दिवसात दुपारपर्यंत करापोटी पालिकेच्या तिजोरीत तीन कोटीहून अधिक रुपये जमा झाले होते. दरम्यान, सुट्टेच नसल्यामुळे दैनंदीन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याची मोठी अडचण नागरिकांपुढे निर्माण झाली आहे. तर याच कारणास्तव ग्राहक फिरकत नसल्यामुळे व्यापाऱ्यांची दुकानेही ओस पडली आहेत. बंदी घातलेल्या नोटा वापरून सोने खरेदी करण्याची शक्कल लढवण्यात आल्यामुळे सराफांनी सोन्याच्या किंमतीत वाढ करून संधी साधली. तर सुट्टे नसल्याचे कारण देवून पेट्रोलपंप चालकांनी किमान पाचशेचे पेट्रोल भरण्याची सक्ती केली.