किल्ल्यांच्या संवर्धन - सुशोभीकरणासाठी फोर्ट फेडरेशन स्थापन करण्याची गरज - छत्रपती संभाजी राजे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 08:10 PM2020-09-03T20:10:52+5:302020-09-03T20:11:12+5:30

घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शना खाली सुरु असून या कामाच्या पाहणी साठी तसेच परिसरात उभारल्या जाणाऱ्या शिवसृष्टी साठी संभाजी राजे आले होते .

Conservation of forts - Need to establish Fort Federation - Chhatrapati Sambhaji Raje | किल्ल्यांच्या संवर्धन - सुशोभीकरणासाठी फोर्ट फेडरेशन स्थापन करण्याची गरज - छत्रपती संभाजी राजे 

किल्ल्यांच्या संवर्धन - सुशोभीकरणासाठी फोर्ट फेडरेशन स्थापन करण्याची गरज - छत्रपती संभाजी राजे 

googlenewsNext

 

 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - संवर्धन व सुशोभीकरण करताना किल्ल्यांचे ऐतिहासिक स्वरूप कायम रहावे यासाठी फोर्ट फेडरेशन स्थापन करण्याची गरज छत्रपती तथा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आज गुरुवारी घोडबंदर किल्ल्याच्या भेटी दरम्यान बोलून दाखवली . 

 

घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शना खाली सुरु असून या कामाच्या पाहणी साठी तसेच परिसरात उभारल्या जाणाऱ्या शिवसृष्टी साठी संभाजी राजे आले होते . आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंती वरून संभाजीराजे यांनी किल्ला व परिसराची पाहणी केली . 

 

खासदारकीचे मला महत्व नसून ते माझ्यासाठी दुय्यम आहे . परंतु छत्रपतींच्या घराण्यातील मी असल्याने किल्ल्यांचे संरक्षण , संवर्धन माझी नैतिक जबाबदारी आहे . अनेक लोकांची इच्छा असते कि , किल्ल्याचे जतन झाले पाहिजे . पण त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने प्लास्टर केले जाते , रंग मारला जातो . त्यामुळे फोर्ट फेडरेशन स्थापन करण्याचा आपला विचार आहे . त्या मध्ये अनेक विद्वान , तज्ञ असतील . 

 

आज त्या त्या भागातील लोकं काम करण्यास इच्छुक असतात . घोडबंदर गावातील ग्रामस्थ जागरूक आहेत . त्यांनी ठेकेदाराने किल्ल्याला प्लास्टर करायला घेतले त्याला पळवून लावले . फेडरेशन झाल्यास त्या त्या भागातील लोकांना किल्ला संवर्धन , संरक्षण साठी ताकद मिळेल . त्यांना योग्य मार्गदर्शन होईल . 

 

फेडरेशन मध्ये निधी उभारून किल्ल्यांसाठी देता येईल . आज सरकार , पालिका पैसे देईल . आ. सरनाईक उद्योजक आहेत म्हणून तेपण खर्च करतील . पण आज अनेक लोकं किल्ल्यांच्या गतवैभवा साठी पैसे देण्यास इच्छूक आहेत . 

 

पूर्वीचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांच्या कडे मी मागणी केली आहे कि , दरवर्षी एक कॅबिनेट मिटिंग रायगड किल्यावर झाली पाहिजे. खऱ्या अर्थनाने स्वराज्य का छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले हि संकल्पना पुढाऱ्यांना समजली तर काम करायला आणखी सोपे होईल . पुढारी काही वाईट नसतो . 

 

सर्व खासदार, मंत्री , आमदार आदी नि एक कुठला किल्ला दत्तक घेतला आणि केंद्र व राज्याच्या मार्गदर्शक सूचनां प्रमाणे काम केले तर महाराष्ट्राचे वैभव , एक जिवंत इतिहास जो या स्मारकां मध्ये लपलेला आहे तो इतिहास जिवंत होईल असे संभाजी राजे म्हणाले . 

 

आमदार प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाचे काम पाहण्यासाठी इथे बोलावले याचा आनंद आहे. सरनाईक व ग्रामस्थ देखील शास्त्रीय पद्धतीने आपल्या किल्याचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत याचे त्यांनी कौतुक केले . 

Web Title: Conservation of forts - Need to establish Fort Federation - Chhatrapati Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.