शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अदानी कंपनीच्या तोडफोडी प्रकरणी 20 ते 25 जणांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 13:34 IST

वीज दरवाढ कमी करण्याच्या मागणीवरुन काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भाईंदरच्या अदानी इलेक्ट्रीसीटी कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोनलावेळी झालेल्या तोडफोडी प्रकरणी अदानी कंपनीच्या फिर्यादी वरुन २० ते २५ अज्ञातांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ठळक मुद्देकाँग्रेसचे अदानी कंपनीविरोधात आंदोलननवघर पोलीस ठाण्यात 25 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल वाढीव वीजबिलाविरोधात काँग्रेसचं आंदोलन

मीरारोड - वीज दरवाढ कमी करण्याच्या मागणीवरुन काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भाईंदरच्या अदानी इलेक्ट्रीसीटी कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोनलावेळी झालेल्या तोडफोडी प्रकरणी अदानी कंपनीच्या फिर्यादी वरुन २० ते २५ अज्ञातांविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे ही तोडफोड काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अडचणीची ठरली आहे.अदानी इलेक्ट्रीसीटीने पाठवलेली वीज देयके भरमसाठ दरवाढीची असल्याने त्या विरोधात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या अधिकारयांना भेटुन निवेदन दिले होते. परंतु निवेदन देऊन देखील कार्यवाही न झाल्याने शनिवार १५ डिसेंबर रोजी काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भाईंदर फाटक येथील कंपनी कार्यालया बाहेर काँग्रेसने निदर्शने करुन दरवाढ कमी करण्याच्या घोषणा दिल्या होत्या.

(अदानी कार्यालयावर काँग्रेसचा हल्लाबोल)हुसेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ कंपनीच्या अधिकारयांना भेटण्यासाठी जाणार असताना २० ते २५ जणांनी कंपनीचे प्रवेशद्वार , फलक, रखवालदाराची चौकी आदिंची तोडफोड केली होती. पंखे, दुरध्वनी यंत्र, फलक, झाड्याच्या कुंड्या आदींच्या तोडफोडीने सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद कंपनीचे विशेष अधिकारी प्रकाश सावंत यांनी नवघर पोलीस ठाण्यात दिली. सावंत यांच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी २० ते २५ अनोळखी लोकां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक विजय टक्के पुढिल तपास करत आहेत. दरवाढ कमी न केल्यास वीज देयक न भरता लोकं असहकार आंदोलन सुरू करतील, असा इशारा हुसेन यांनी दिला होता.