शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा स्वत:च्या पायावर धोंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:14 IST

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशभर भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे अशी जाहीर भूमिका घेत

अतुल कुलकर्णीमुंबई : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी देशभर भाजपेत्तर पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली पाहिजे अशी जाहीर भूमिका घेत असताना महाराष्टÑात मात्र काँग्रेसने आपल्या पायावर स्वत:च्या हाताने धोंडा पाडून घेतला आहे. देशभर इतरत्र झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व पक्ष एकत्र आले आणि त्यांनी भाजपाला पराभूत केले. तसे करणे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शक्य असतानाही प्रदेश काँग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शक्ती नसताना पक्षाचा उमेदवार देऊन नामुष्की ओढवून घेतली आहे.पालघरची जागा भाजपाने जिंकली पण काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी निर्णय घेण्यात घातलेल्या घोळामुळे ही वेळ आली आहे. पालघर पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी द्या, असे म्हणत माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित पक्षाच्या सगळ्या नेत्यांना भेटले. दया याचना केली मात्र तुम्ही निवडून येऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही दामोदर शिंगडा यांनाच उमेदवारी देऊ असा आग्रह काही नेत्यांनी धरला. आता परिस्थिती बदलली आहे, शिंगडा निवडून येणार नाहीत, असे सांगूनही राजेंद्र गावित यांचे ऐकले नाही. गावित भाजपाकडे गेल्यानंतर त्यांना तिकीट नाकारणाऱ्यांनी; आमचा उमेदवार पळवला, भाजपाकडे उमेदवार नाहीत, त्यांना उमेदवार आयात करावे लागतात, अशी हाकाटी सुरु केली.उमेदवार अंतिम करण्याच्या काळात; आपण बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देऊन टाकू असा प्रस्ताव राष्टÑवादीने काँग्रेसपुढे ठेवला होता. मात्र तो ही काँग्रेसने नाकारला. ती सल निकालानंतर काँग्रेस लेना बँक आहे, देना बँक नाही... अशा शब्दातबहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी बोलून दाखवली. जर बहुजन विकास आघाडीला दोन्ही काँग्रेसने पाठिंबा दिला असता तर काँग्रेसची ‘झाकली मुठ सव्वालाखाची’ राहीली असती. मात्र निवडणूक लढवून, आपल्या उमेदवाराचे डिपॉझीट जप्त होणे व पक्ष चौथ्या नंबरवर जाणे यामुळे प्रदेश काँग्रेसच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाने देशभरात भाजपाला जोरदार धक्का दिला. भाजपाचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री व अन्य अनेक मंत्री विदर्भात आहेत, ज्या ठिकाणी संघाचे मुख्यालय आहे, त्या विदर्भात; भंडारा-गोंदियात भाजपाच्या उमेदवाराचा दारुण पराभव होत असताना काँग्रेसच्या ‘स्वमग्न’ नेत्यांनी मात्र हात दाखवून अवलक्षण करुन घेतले. एवढे चांगले वातावरण सरकारविरोधी असताना, पालघरमध्येआपल्याला यश मिळणार नाही हे कळत असतानाही आमच्या नेत्यांनी केलेल्या कृतीचा फटका राज्यभर बसू शकेल, याचेही भान आमच्या नेत्यांना राहीले नाही, अशा शब्दातअनेकांनी भावनांना वाट करुन दिली. 

टॅग्स :palgharपालघरPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018congressकाँग्रेस