वसई : मुंबई, भार्इंदर, वसई आणि पालघरहून वेलंकनी या तीर्थस्थानी दररोज किमान पाच हजार ख्रिस्ती भाविक जात असतात. मात्र, मुंबईहून थेट गाडी नसल्याने भाविकांना दूरचा प्रवास करावा लागतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी वेलंकनीला आठवड्यातून किमान एक गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे वसई शहर अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. वेलंकनीला जाणारी गाडी वांद्रे-वसई-पालघर मार्गे जात असल्याने तिरुपती देवस्थानला जाणाऱ्या भाविकांचीही सोय होईल, असे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
वेलंकनीसाठी आठवड्याला गाडी सोडण्याची काँग्रेसची मागणी
By admin | Updated: February 13, 2017 04:42 IST