सुरेश काटे , तलासरीतालुक्यातील आच्छाड औद्योगिक वसाहतीमधील टीमा या बॉयलर उत्पादनातील अग्रगण्य कंपनीचे सीईओ हरिष सिप्पी हे आदिवासी तरुणांना प्रशिक्षित करून त्यातील गुणवान प्रशिक्षणार्थींना आपल्या कंपनीतच रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी कंपनीमध्येच प्रशिक्षण केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कंपनी व्यवस्थापना कडून प्रयत्न सुरु आहेत तलासरी भागात रोजगाराच्या संधी कमी असल्याने या भागातील आदिवासी तरु ण पोटाची खळगी भरण्यासाठी गुजरात राज्यात व इतरत्र जातात. सुशिक्षित तरु णही मोठया प्रमाणात आहेत. पण त्याच्याकडे कुशल कामाचे ज्ञान नसल्याने त्यांना मजुरीचे काम करावे लागते. परंतु या प्रयोगामुळे तालुक्यातील शिक्षित तरुणांना आपल्या भागातच रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
प्रशिक्षणाव्दारे कंपनी तरु णांना रोजगार देणार
By admin | Updated: February 9, 2017 03:44 IST