शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
3
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
4
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
5
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
6
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
7
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
8
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
9
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
10
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
11
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
12
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
13
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
14
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
15
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
16
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
17
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
18
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
19
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
20
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...

विरारमध्ये रंगला सामुदायिक विवाहसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:36 IST

जीवदानी देवी संस्थानाकडून पुढाकार; ७० जोडप्यांना भावी जिवनासाठी दिल्या शुभेच्छा

वसई : विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानाच्यावतीने गुरूवारी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७० जोडप्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून भावी जिवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय ठाणे यांच्या सहकार्याने या सामूदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यात वसईतील २५,तलासरी ३३,विक्र मगड व जव्हार येथील १० आदिवासी समाजातील जोडप्यांचा समावेश होता.तसेच यातील १२ जोडपी इतर समाजातील होती. जिल्हातील गरीब शेतकऱ्यांना आपल्या मूला- मुलींची लग्ने खर्चाची गोळाबेरीज बसविण्यासाठी कधी कर्ज तर कधी जमीन गहाण ठेवून व्यवस्था करावी लागते. अनेकदा कर्जापोटी शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून त्यांच्या विवाहयोग्य मूला-मूलींचे सामूहिक विवाह लावण्यासाठी धर्मदाय संस्थांच्या आवाहनानुसार हा पुढाकार घेण्यात आला होता. नवदांपत्यांना आशिर्वाद देण्यासाठी ठाणे धर्मादाय आयुक्त अशोक चुरी, वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर, शिवसेना डोंबिवलीचे आमदार सुभाष भोईर, नालासोपाºयाचे आमदार क्षितीज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, जीवदानी देवी ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र गावड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथ पाटील, वसईचे तहसीलदार किरण सुरवसे आदि मान्यवर उपस्थित होते.नवदांपत्यांना दिले आहेरसामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या. त्यात वधूला १ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, वधु-वरांना कपडे, संसार उपयोगी भांडी व देवघरातील निरांजन आदि वस्तू देण्यात आल्या.हा उपक्रम ट्रस्ट दरवर्षी राबविणार आहे. एखादी संस्था अगर वैयिक्तक लग्न सोहळ्यासाठी गडा खाली असणारे ट्रस्टचे मंगल कार्यालय अल्पदरात उपलब्ध करून दिले जाईल.- पंकज ठाकूर, उपाध्यक्ष, जिवदानी ट्रस्ट

टॅग्स :marriageलग्नVasai Virarवसई विरार