शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाच्या सावटामुळे यंदा सामूहिक प्रार्थना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:32 IST

Vasai News : २५ डिसेंबरला असलेल्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून, येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो.

वसई : ख्रिस्त आगमनाच्या काळाला यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारपासून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर वसईतील चर्चमध्ये काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित सामाजिक अंतर व नियम पाळून जांभळ्या मेणबत्तींचे विधिवत प्रज्वलन करण्यात आले. यंदा काेराेनाचा धाेका टाळण्यासाठी सामूहिक मिस्सा (प्रार्थना) रद्द करण्यात आल्या आहेत.२५ डिसेंबरला असलेल्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून, येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो. त्यानंतर, २४ डिसेंबरच्या मध्यरात्री प्रभू येशू जन्माच्या वेळी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी आगमन काळाला सुरुवात झाली. त्या निमित्त वसईच्या विविध चर्चमध्ये जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. ख्रिस्ती श्रद्धेनुसार जांभळा रंग हा आशेचा रंग आहे. येशू जन्माच्या ७०० वर्षेआधी संदेशाद्वारे येशूच्या जन्माचे भाकीत करून तत्कालीन लोकांना पापमुक्ती आणि तारणाची आशा दिली होती. त्याचेही प्रतीक म्हणून ही मेणबत्ती प्रज्वलित केली जाते. मेणबत्ती स्वत: जळून इतरांना प्रकाश देते, तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यातून बोध घेऊन इतरांसाठी जगण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ही मेणबत्ती प्रभू येशूचा प्रकाश, नकारात्मक विचारांनी व्यापलेल्या भोवतालात सकारात्मक प्रकाशाची दिशा आहे, असेही आगमन काळातील मेणबत्तीचे महत्त्व आहे. 

ख्रिस्तप्रसाद चर्चच्या बाहेरख्रिस्ती धर्मात सामूहिक मिस्सा (प्रार्थना) केली जाते. सध्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका असल्याने सामूहिक मिस्सा रद्द केल्या असल्याची माहिती वसईचे धर्मगुरू फादर मॉन्सेनिअर कोरिया यांनी दिली. ठरावीक भाविकांच्या उपस्थितीत मिस्सा करण्यात येत आहे. यंदा कोरोनामुळे चर्चमध्ये देण्यात येणारा ख्रिस्तप्रसाद भाविकांनी चर्चच्या बाहेर जाऊन घ्यायचा आहे, तसेच चर्चमध्ये प्रार्थना करताना सामाजिक अंतर व गर्दी न करण्याचे आवाहनही धर्मगुरूंनी केले आहे.

टॅग्स :ChristmasनाताळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरार