In the coastal crisis due to rocky excavation | दगडगोट्यांच्या उत्खननामुळे किनारपट्टी संकटात
दगडगोट्यांच्या उत्खननामुळे किनारपट्टी संकटात

- अजय महाडिक


मुंबई : वसईतील तानसा नदीचा काठ जागोजागी कोसळू लागला आहे. नदीपात्रातील रेती व दगडगोट्यांच्या उत्खननामुळे नदीची खोली वाढली असून किनारपट्टीच्या अनेक शेतजमिनींना धोका निर्माण झाला आहे. क्रशस्टँड मशीन वर रेती बनवण्यासाठी साठी लागणारा दगड गाट्याची कोणताही परवाना नसताना तानसा नदीतून दिवस-रात्र उचल होत असल्याने किनारपट्टी संकटात आहे.


जंगलातील परवाना धारक दगड आणून त्या पासून क्र ॅश बनवण्याची परवानगी असताना तानसा नदीत उसगाव, पारोळ या ठिकाणी पोकलन मशीन उतरवुन रोज शेकडो गाड्यांची उचल केली जाते व तो विनापरवाना दगड गोटा शिवणसई येथे मशीन वर आणून त्याचा साठा केला जातो. अशाच प्रकारची धुळफेक खानिवडा, खाडी, कोपर व शिरसाड येथे दररोज होत आहे. याविरोधात आतापर्यंत महसूल प्रशासनाने केलेली कारवाई म्हणजे, ‘मी धरल्यासारखे करतो, तू मारल्यासारखे कर’ अशा स्वरूपाची झाल्याने केवळ एकदोन बोटींवरील सक्शनपंपांवर कारवाई करणे, मात्र गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये कुणालाही न गोवणे, असा फार्स रचला जात आहे.


रेतीमाफियांची ही मॅनेजमेंट असल्याचे चांदीप, उसगाव व शिवणसईचे गावकरी सांगतात. दिवसा नदीकिनाऱ्यावर मोठी शांतता दिसत असली, तरी रात्री साडेआठ वाजले की, रेती व दगडगोट्यांच्या उत्खननाला सुरुवात होते. मुख्यत: उसगावहून ही उचल होत असून शिवणसई गावात मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर तिचा साठा केला जातो. त्या साठ्याला स्थानिक डेपो असे म्हणतात. येथेच तानसा नदीतील या दगडगोट्यांचे मशीनच्या साहाय्याने (क्रशर) तुकडे केले जातात.


या मार्गाने आणि अशी होते तस्करी
तयार मालाची वाहतूक शिरसाड-अंबाडीमार्गे केली जाते. अनेकदा हे ट्रक ओव्हरवेट असतात. दोन ब्रासची क्षमता असताना चार ब्रासची वाहतूक होत असते. मोठ्या आयवा ट्रकमध्ये आठ ब्रास मालदेखील भरला जातो.
विरार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाºया मांडवी, केनर या पोलीस चौक्यांवरून ही वाहतूक होत असते. निघणाºया प्रत्येक गाडीमागे हजार रुपये, असा हिशेब ठेवण्यात येतो. अशा प्रकारे खानिवडे बंदरातून रोज किमान १०० गाड्या निघतात.
असाच अर्थपूर्ण व्यवहार खार्डी, कोपर, चांदीप, उसगाव, पारोळ या रेतीबंदरांवर ठेवला जातो. तयार माल निंबवली, भालिवली, पारोळ, भिवंडी, खार्डी, विरारफाटा, आडणे, शिरवलीमार्गे बाहेर निघतो. दरम्यान, ही वाहतूक मांडवी, कणेर, सोपाराफाटा, चिंचोटी, बाफाणे या पोलीस पोस्टच्या समोरून होत असते.
 

माझे फक्त एक क्रशरस्टॅण्ड आहे. आणखी आठ, नऊ ठिकाणी क्रशिंग होते. नुकतेच आणखी दोन क्रशरस्टॅण्ड सुरु झाले आहेत. माझ्याकडे परवानगी आहे. प्रदूषण नियंत्रणाची एनओसीसुद्धा माझ्याकडे आहे. सध्या माझा हा व्यवहार माझा मुलगा अभिजीत बघतो - एकनाथ राऊत, क्र शरस्टॅण्डचे मालक (शिवणसई)
महसूल विभागाकडून रेती माफियांविरोधात कारवाई सुरुच आहे. चांदीप, उसगाव व शिवणसई भागांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे अधिकाऱ्यांना पाहण्यास सांगतो. मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालणार आहे. - किरण सुरवसे, तहसीलदार (वसई)


Web Title: In the coastal crisis due to rocky excavation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.