शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक रासायनिक कारखाने बंद करणार; उद्योगमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 02:27 IST

तारापूरच्या रासायनिक कारखान्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली. अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, परंतु काही उपयोग झाला नाही,

बोईसर : ज्यात नागरिकांचा, कामगारांचा जीव जातो, असे उद्योग उपयोगाचे नाहीत. अशा प्रकारचे धोकादायक रासायनिक कारखाने सुरू ठेवायचे की नाहीत, याचा एकदाच काय तो निर्णय आता घ्यावा लागणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली असून, त्यात काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

तारापूरच्या रासायनिक कारखान्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली. अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, परंतु काही उपयोग झाला नाही, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तारापूरच्या स्फोटाची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी दुपारी तारापूर औद्योगिक वसाहतीत जाऊन स्फोटाच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. ही दुर्घटना धक्कादायक असून, माझी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल आम्हाला मिळाला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची गरज आहे. ती वरिष्ठ पातळीवरून होईल. त्यात जे जे जबाबदार असतील, मग ते कुठल्याही खात्याचे असोत, त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत, यासाठी ज्या उपाययोजना करायच्या, त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेतले जातील, असे देसाई यांनी सांगितले.

वसईचे कार्यालय तारापूरलामहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्यांचा आधार घेत, येथील कारखान्यात उत्पादन सुरू केले जाते. मात्र, ज्या उत्पादनासाठी परवानगी घेतली जाते, त्याऐवजी वेगळे उत्पादन घेतले जात असल्याची बाब यावेळी देसाई यांच्या निदर्शनास आणण्यात आली. असे धोकादायक उत्पादन घेणाऱ्या कारखान्याची जी नियमित तपासणी करण्याची गरज आहे, ती अपुºया अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे होत नाही. त्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय वसईऐवजी तारापूरला आणावे, अशा सूचना केल्यानंतर देसाई यांनी कार्यालय त्वरित तारापूरला आणले जाईल, असे जाहीर केले, तसेच ज्या खात्याकडे मनुष्यबळ कमी आहे, त्यांना ते तत्काळ वाढवून दिले जाईल. यात विलंब होणार नाही, असे सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे