शहरं
Join us  
Trending Stories
1
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
2
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
3
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
4
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
5
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
6
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
7
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
8
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
9
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
10
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
11
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
12
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
14
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
15
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
16
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
17
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
18
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
19
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
20
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले

तुंगारेश्वरचा बंद झालेला जिझिया प्रवेशकर पुन्हा सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 23:03 IST

मंदिर, अभयारण्याला भेट द्यायचीय, ४८ रुपये मोजा! भाविकांमध्ये असंतोष, स्थानिक नगरसेवक करणार उपोषण आंदोलन

- मंगेश कराळे नालासोपारा : पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या तुंगारेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून आणि तुंगारेश्वर अभयारण्य फिरायला येणाºया लोकांकडून ४८ रुपये प्रवेश कर घेतला जात असल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पूर्वीही ३६ रुपये प्रवेश शुल्क घेतले जात होते, मात्र आमदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर ते बंद करण्यात आले होते. आता पुन्हा हा जिझिया प्रवेश कर आकारला जात असल्याने भाविक तसेच पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.तुंगारेश्वर पर्यटन स्थळाला अभयारण्याचा दर्जा मिळाल्यानंतर या ठिकाणी येणाºया पर्यटकांना अनेक अन्यायकारक बाबींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येते. या पर्वतावर पर्यटनाव्यतिरिक्त बालयोगी सदानंद महाराज यांचा आश्रम आहे. या आश्रमाच्या माध्यमातून वर्षभर समाज प्रबोधन, बालसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जाते. त्यामुळे वर्षभर पर्वतावर भाविकांचा राबता असतो. सध्या या ठिकाणी पर्यटनासाठी पर्यटकांचा राबताही असतो. मात्र त्यांच्याकडून, भाविकांकडून पर्यटन कर म्हणून पैसे वसूल केले जातात. पर्वतस्थळावर लावण्यात आलेल्या झिजिया कराविरोधात स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकदा आवाज उठवूनही अन्यायकारक झिजिया कर घेणे सुरूच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्यंतरी भाविकांनी तुंगारेश्वर पर्वतावरील मंदिराच्या दानपेटीत कराच्या पावत्या टाकून नाराजी व्यक्त केली होती.वसईतील प्रसिद्ध श्री तुंगारेश्वर महादेव व परशुराम तीर्थ येथे हजारो वर्षांपासून लाखो भाविक दर्शनास येतात. राज्य सरकारच्या वन विभागाने येथे येणाºया भाविकांकडून प्रत्येकी ४८ रुपये कर आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रवेश शुल्क भरला नाही तर देवाचे दर्शन घेता येणार नाही, असा जाचक हुकूम लादण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र असंतोषाचे व रोषाचे वातावरण आहे. सर्व स्तरातून याचा निषेध व्यक्त होत आहे.वन विभाग अस्तित्वात येण्याआधीपासून तुंगारेश्वर हे प्रसिद्ध मंदिर तुंगारेश्वर अभयारण्यात आहे. वसई तालुक्यातील प्रसिद्ध असे शंकराचे मंदिर येथे असून सोमवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येतात. वसई मार्गाने या ठिकाणी येणाºया भाविकांची प्रवेश शुल्काच्या नावावर अक्षरश: लूट केली जात असल्याची चर्चा आहे. या आश्रमामध्ये औषधी उपचार आणि वनौषधी दिली जात असल्यामुळे रुग्ण सुद्धा या ठिकाणी येतात. सरकार आणि वन विभाग ४८ रुपयांचे प्रवेश शुल्क घेते खरे, परंतु येणाºया लोकांसाठी काय सुविधा देतात? येणाºया-जाणाºया लोकांसाठी साधे शौचालयसुद्धा बांधलेले नाही. असे असताना ४८ रुपयांचा जिझिया कर कशाला घेता? हा प्रश्न येथे येणाºया भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षीतिज ठाकूर यांनी प्रवेश शुल्काबाबत आवाज उठवल्यानंतर वन विभागाने हे शुल्क घेणे बंद केले होते. पण परत त्यांनी प्रवेश शुल्क सुरू केल्याने याविरोधात मी लवकरच आमरण उपोषणाला बसणार आहे. प्रवेश शुल्क घेऊन सुद्धा रस्ता, पिण्याचे पाणी, स्वछतागृह यांची कोणतीही मूलभूत सुविधा देत नसल्याने नेमके पैशाचे वन विभागाकडून काय केले जाते?- रमेश घोरकाना, नगरसेवक, बविआअनेक वेळा पत्रव्यवहार केला, पण काहीही उपयोग नाही. प्रवेश शुल्काच्या नावावर ४८ रुपये भाविकांकडून घेतले जातात. मात्र काहीही सुविधा देत नाहीत. मग कर कसला घेता? मंदिराकडे येण्या-जाण्यासाठीचा रस्ता सुद्धा मंदिर प्रशासन देणगीतून करत आहे.- पुरुषोत्तम पाटील,अध्यक्ष, तुंगारेश्वर देवस्थानशंकराचे प्रसिद्ध मंदिर, कुंड आणि सदानंद महाराज यांचा आश्रम असल्यामुळे आम्ही नेहमी तुंगारेश्वरला जातो. पण कोणतीही सुविधा नसताना भाविकांकडून प्रवेश शुल्काच्या नावाखाली सुरू असलेली लूट कधी थांबणार?- नितेश रोखीत, भाविक