शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला! विरारमध्ये घराला लागलेल्या आगीत बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:33 IST

विरारमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आणलेल्या शिक्षिका महिलेच्या घराला आग लागल्याने आगीमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या आहेत.

मंगेश कराळे

नालासोपारा :- नुकत्याच बारावीच्या परीक्षा पार पडल्या. परीक्षेचे टेन्शन गेल्याने विद्यार्थी निर्धास्त झालेत. पण काही महिन्यांतच लागणाऱ्या निकालाचेही टेन्शन आहेच की... दुसरीकडे शिक्षकांचीही बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीची लगबग सुरू आहे. अशातच विरारमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली असून शिक्षिकेच्या घरी लागलेल्या आगीमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. ऐन शिमग्याच्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आगीच्या भक्षस्थानी गेल्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.

विरारमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आणलेल्या शिक्षिका महिलेच्या घराला आग लागल्याने आगीमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीवर लागलं आहे. विरारच्या आगाशी येथील गंगुबाई अपार्टमेंट परिसरात ही घटना घडली आहे. शिक्षिकेने १२ वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणली होत्या. कामानिमित्त शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचे घर बंद असतानाच शॉर्ट सर्किट झाल्याने घरामध्ये मोठी आग लागली, ज्यामध्ये या पेपरसह घरातील इतर सामानही जळून खाक झालं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, बारावीच्या उत्तर पत्रिका कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक असताना शिक्षिकेने नियम तोडून त्या घरी कशा नेल्या? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पेपर तपासणीसाठी घरी कसे आणले? असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :VirarविरारStudentविद्यार्थीHSC / 12th Exam12वी परीक्षा