शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

वसईत दोन गटांमध्ये भीषण राडा; परस्परांविरोधात गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 23:44 IST

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर घटना; कुणालाही अटक नाही

वसई- वसईच्या नवघर माणिकपूर शहरातील स्टेला स्थित अरुणोदय नगर हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या दोघा सदस्यांनी हौसिंग सोसायटीचे नियम तोडले याचा जाब विचारल्याच्या शुल्लक कारणावरून सोसायटी मधील दोन गटात भीषण राडा झाल्याची गंभीर घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.दरम्यान या हौसिंग संकुलातील दोन गटातील भीषण राडेबाजीमुळे सोसायटीत व आजूबाजूच्या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर माणिकपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आपल्या फौजफाट्यासह सोसायटीत धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. या संदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती माणिकपूर पोलीस निरिक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमत ला दिली      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन घोषीत आहे.त्यात सोसायटी संकुलात कार्यकारी मंडळाने काही सूचना व नियम तयार केले असताना या घटनेतील आरोपींनी नियमांचे पालन न केल्याने त्याचा जाब विचारायला गेलेल्या प्रशांत गोरे यांच्या सहित इतर तिघांना आरोपी अवणेश निवेकर व जॉन फर्नांडिस यांनी लोखंडी दांडक्याने तसेच विटा,व लोखंडी कुऱ्हाड व चाकूच्या सहाय्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले.या भीषण मारहाणीत प्रशांत गोरे,उमेश वेदक,प्रशांत शिपूरकर,उद्धव वेदक (सर्व रा.बरामपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी जखमी प्रशांत गोरे यांच्या फिर्यादीवरून माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.क्रं.178 /2020 दाखल करण्यात आला आहे. तर याच संकुलातील दुसऱ्या गटाकडून दिलेल्या गुन्हा रजि.क्र.179 /2020 फिर्यादी नुसार यातील पाच आरोपी पैकी एकाने आधी फोन करून बोलावून घेतले व तुम्ही वेळेचे पालन करीत नाही असे सांगताच फिर्यादी व त्याच्या भावाला आरोपी प्रशांत गोरे, उमेश वेदक, उद्धव वेदक, वेली परेरा व उद्धव वेदक यांच्या पत्नी (नाव माहित नाही)  या सर्वांनी मिळून अवणेश निवेकर व त्याचा भाऊ जॉनी फर्नांडिस यांना विटेच्या साहाय्याने मारहाण केली असता ते दोघे जण जखमी झाले.परिणामी माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत या दोन्ही गुन्ह्यातील सातही आरोपींची सोसायटीत येऊन सोड्वा सोडवी करीत सर्वांना ताब्यात घेऊन दोन्ही गटातील घटनाक्रम पाहता परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी स्वतः भेट देऊन हे गंभीर प्रकरण शांत केले असून या एकूणच घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांच्याकडे दिला आहे."अरुणोदय नगर सोसायटीत झालेली घटना गंभीर आहे, या मारहाणीत दोन गटात दोन परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून कोरोना मुळे आपण प्रथमदर्शनी या सर्वांना 41 व 149 च्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे अद्याप अटक करण्यात आलेली नाही.- पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे  माणिकपूर पोलीस ठाणे,वसई रोड    लॉकडाऊन काळात वसईची कायदा सुव्यवस्था ढासळतेय का?वसईत लॉकडाऊन काळात किरकोळ वादातून खुनाच्या तीन घटना ताज्या असताना गुरुवारी हि चौथी घटना भीषण मारहाणीची घडली खरी मात्र  योग्य वेळीं पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानेच मोठा अनर्थ टळला. मात्र त्याची दाहकता फार गंभीर स्वरूपाची असून भविष्यात हा वाद पुन्हा उफाळून आला तर तो एका गंभीर गुन्ह्याचे स्वरूप नक्कीच धारण करू शकेल.